शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

गांधीबाग कापड बाजारातील संपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:20 IST

- व्यवसायावर परिणाम : व्यापारी व नागरिक त्रस्त, वाहतुकीची कोंडी नागपूर : गांधीबाग कापड बाजारातून ये-जा करणे सध्या कठीण ...

- व्यवसायावर परिणाम : व्यापारी व नागरिक त्रस्त, वाहतुकीची कोंडी

नागपूर : गांधीबाग कापड बाजारातून ये-जा करणे सध्या कठीण झाले असून, सिमेंटीकरणासाठी रस्त्यांचे खोदकाम करून सोडून देण्यात आले आहे. अशा स्थितीत ओबडधोबड रस्त्यांवर वाहतुकीला त्रास होत आहे. त्यामुळे व्यापारी आणि नागरिक त्रस्त आहेत. वाहतुकीची कोंडी ही नेहमीची डोकेदुखी ठरली आहे.

गांजाखेत चौकापासून गांधीबाग उद्यान आणि नंगा पुतळा चौकाकडे जाणारे रस्ते सिमेंटचे बनविण्यासाठी खोदण्यात आले आहेत. बाजारातील संपूर्ण रस्ते खोदल्याने समस्या आणखी वाढली आहे. रस्त्याच्या एकाच बाजूने खोदकाम करून सिमेंटीकरण केले असते तर समस्या वाढली नसती, असे व्यापाऱ्यांचे मत आहे; पण कंत्राटदाराने मनमानी पद्धतीने सर्वच रस्ते खोदून सोडून दिले असून, कंत्राटदाराने डांबरीकरण वा सिमेंटीकरणाचे काम सुरू केले नाही. त्यामुळे बाजारात ये-जा करणाऱ्यांना त्रास होत असून, व्यवसायावर परिणाम झाला आहे.

सायंकाळी या भागात वाहतुकीची होणारी कोंडी, ही नेहमीचीच बाब झाली आहे. याशिवाय मालाच्या वाहतुकीसाठी ट्रकचालकांना अडचणी येत आहेत.

मनमानी पद्धतीने खोदले रस्ते

नागपूर ट्रकर्स युनिटी असोसिएशनचे अध्यक्ष व व्यावसायिक कुक्कू मारवाह म्हणाले, कंत्राटदाराने एका बाजूचा रस्ता खोदून काम पूर्ण करायला हवे होते; पण कंत्राटदाराने एकाचवेळी सर्व रस्ते खोदले आहेत. गांजाखेत चौकातील वळण मार्गावर सर्वाधिक खड्डे झाले आहेत. या ठिकाणी अपघाताची नेहमीच शक्यता असते. गांधीबाग रस्त्यालगतच्या दुकानदारांना पार्किंगसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे दुकानात ग्राहक येत नाहीत. दुसरीकडे वाहतूकदारांनाही मोठा फटका बसला आहे.

२.८७ कोटींच्या निधीतून होत आहे सिमेंटीकरण

प्राप्त माहितीनुसार, गांधीबाग कापड बाजारातील रस्ते अनेक वर्षांपासून खराब आहेत. त्यामुळे वाहतूक आणि व्यापाऱ्यांना त्रास होतो. आ. विकास कुंभारे यांनी तत्कालीन राज्य शासनाकडून येथील रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी २.८७ कोटी रुपये मंजूर केले; पण कंत्राटदाराची कार्यप्रणाली मोठी समस्या बनली आहे. कुंभारे म्हणाले, गांधीबाग बाजारातील रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात येत आहे. हा भाग बाजाराचा असल्याने काम वेळेत पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत. कोरोना महामारीमुळे काम बंद होते. आता काम वेगात सुरू आहे. ते लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.