शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

कागदावरील संशोधन जमिनीवर उतरवा - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 6, 2015 02:14 IST

पंदेकृव्ही दीक्षांत समारंभ; शेती ते बाजारपेठ साखळी निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे मतंव्य.

अकोला : कृषी क्षेत्रासमोर शेतकरी आत्महत्या, नापिकी, अनियमित हवामान हे मोठे संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी कृषी विस्ताराच्या माध्यमातून कृषी विद्यापीठांना शेतकर्‍यांचे प्रबोधन करावे लागणार आहे. कृषी विद्यापीठांनी निर्माण केलेले कमी खर्चाचे तंत्रज्ञान, हवामानाला अनुकूल पिकाच्या जाती, संशोधन मोठय़ाप्रमाणात तयार असल्याचे सांगण्यात येत आहे, पण या संशोधनाचा कागदावरच ढीग जमा झाला असून, आता हे कागदावरील संशोधन शेतकर्‍यांच्या शेतात नेण्याची खरी गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अकोला येथे अधोरेखीत केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय परिसरातील दीक्षांत सभागृहात गुरूवार, ५ फेब्रुवारी रोजी आयोजित २९ वा दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषीमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती एकनाथराव खडसे होते. या समारंभाला अकोला-वाशिमचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे (दापोली) माजी कुलगुरू डॉ. किसन लवांदे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.पंदेकृविचे कुलगुरू डॉ.रविप्रकाश दाणी, कुलसचिव ज्ञानेश्‍वर भारती, माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर, डॉ.गोविंदराव भराड, डॉ. व्ही.एम. मायंदे यांच्या उपस्थितीत दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी १0५३ स्नातक, स्नातकोतर आणि आचार्य अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती खडसे यांनी पदवी प्रदान केली. यामध्ये गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य पदके देऊन गौरविण्यात आले. सर्वाधिक चार सुवर्णपदक कृषी शाखेचा पदवीधर मनीष कुमार यांने प्राप्त केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध संशोधनात उल्लेखनीय काम करणारे संशोधक, शिक्षक व कर्मचार्‍यांना विविध पदके, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.