शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
2
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
3
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
4
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
5
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
6
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
7
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
8
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
9
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
10
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
12
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
13
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
14
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
15
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
16
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
17
अधिक मास २०२६: पुरुषसूक्त की विष्णुसहस्रनाम? अधिक मासात कोणते स्तोत्र ऐकणे ठरेल अधिक लाभदायी?
18
उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
19
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
20
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निकालाने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला जोर

By admin | Updated: May 20, 2014 01:00 IST

लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना युतीला विदर्भात १०० टक्के यश मिळाले आहे. विदर्भात भाजपाला नाग विदर्भ आंदोलन समितीने एका अटीवर जाहीर पाठींबा दिला होता

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना युतीला विदर्भात १०० टक्के यश मिळाले आहे. विदर्भात भाजपाला नाग विदर्भ आंदोलन समितीने एका अटीवर जाहीर पाठींबा दिला होता. त्यामुळे भाजपला विदर्भात मोठा फायदा झाला. स्वतंत्र विदर्भ राज्य द्यावे अशी समितीची अट होती. भाजपही स्वतंत्र विदर्भ राज्याचा पुरस्कर्ता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाने स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. महाराष्टÑातील विदर्भाचा भाग वीज व खनिज संपत्तीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. राज्यातील ७० टक्के वीज विदर्भात निर्माण केली जाते. कोळसा, सिमेंट आदींच्या खाणीही विदर्भात आहे. राज्यातील ७८ टक्के जंगल एकट्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. मोठ्या प्रमाणात नद्याही याच भागात आहेत. स्वतंत्र विदर्भाची मागणी १९६० पूर्वीची आहे. ही मागणी घेऊन समितीचे सर्वेसर्वा श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी अनेक आंदोलने केलीत. या मागणीचा कायम पुरस्कार केला. परंतु काँग्रेसप्रणीत सरकारने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. भाजपने १९९१ मध्ये युती सरकारच्या काळात स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात घेतला होता. आजही भाजप विदर्भाचा पुरस्कर्ता आहे. मात्र शिवसेना त्यांचा मित्र असल्याने भाजपची अडचण आहे. परंतु १६ व्या लोकसभेच्या निवडणुकीत नाग विदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी वर्धा येथे नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पक्षाला जाहीर पाठींबा दिला होता. या मोबदल्यात भाजप सत्तेवर आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य द्यावे, अशी त्यांची मागणी होती. गडचिरोली-चिमूर, नागपूर, चंद्रपूर-वणी या लोकसभा मतदार संघात समितीचा मोठा गोतावळा आहे. या पाठिंब्याचा फायदा भाजपला झाला. आता भाजपची केंद्रात एकहाती सत्ता असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य देणे सहज शक्य आहे. यापूर्वी भाजपने छत्तीसगड, झारखंड ही लहान राज्ये निर्माण केली आहेत. त्यामुळे विदर्भालाही न्याय द्यावा, अशी मागणी नाविसचे केंद्रीय अध्यक्ष राजे अम्ब्रीशरराव महाराज यांनी केली आहे व लवकरच ते या संदर्भात भाजपच्या नेत्यांशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. भाजपच्या चंद्रपूर जिल्ह्यातील आमदारांनीही स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला अनुकूलता दर्शविली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)