लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरण वीज हानी कमी करून ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी कटिबद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर ३१ मार्च रोजी संपलेल्या मागील आर्थिक वर्षात कंपनीच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने विदर्भात ४७ कोटी रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली.
उल्लेखनीय म्हणजे, कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भात मंडळ स्तरावर १२ आणि विभागीय स्तरावर ३ असे एकूण १५ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. नागपूर व अकोला येथे सुरक्षा व अंमलबजावणी विभागाची परिमंडळ कार्यालयेही स्थापन करण्यात आली आहेत.
या मोहिमेत गेल्या वर्षात विदर्भातील एकूण १०,७०९ संशयास्पद वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २,९३४ ग्राहकांकडे वीजचोरी आढळली. यात ३४ कोटी रुपयांची वीजचोरी आणि १३ कोटी ४० लाख रुपयांच्या अनियमितता असे एकूण ४७ कोटी ४६ लाख रुपयांचे नुकसान असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. यापैकी ४३ कोटी १४ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. दंड भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ४०२ ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
जिल्हानिहाय प्रकरणेजिल्हा तपासणी चोरी रक्कम लाख वसुली लाख रुपये गुन्हे दाखल अकोला ११८४ ५७२.५७ ५५५.७० २अमरावती १३०१ ८११.२५ ७७०.०३ ३बुलढाणा ७३३ २८६.९६ २३५.८९ ४भंडारा ८२२ २३२.७८ २३२.०६ ११चंद्रपूर ७८४ २१७.१५ ३८७.९७ ४नागपूर २३५९ १३८२.३६ १००१.३७ १७२वर्धा ७७४ २२५.२० २०३.०६ १३यवतमाळ ४६० ११३.९२ १०५,०० ११गोंदिया ७२१ १४५.४२ ८६.०५ ७गडचिरोली ८०४ १६९.९१ १५७.७२ ७वाशिम ७६७ ५८८.७१ ५७९.६१ १४एकूण १०,७०९ ४७४६.२३ ४३१४.४६ ४०२
Web Summary : Mahavitaran uncovered ₹47 crore in power theft in Vidarbha during the last fiscal year. Special squads inspected over 10,709 connections, finding 2,934 cases of theft. ₹43.14 crore was recovered, and 402 customers face charges.
Web Summary : महावितरण ने विदर्भ में पिछले वित्तीय वर्ष में 47 करोड़ रुपये की बिजली चोरी का खुलासा किया। विशेष दस्तों ने 10,709 से अधिक कनेक्शनों का निरीक्षण किया, जिसमें 2,934 चोरी के मामले पाए गए। ₹43.14 करोड़ की वसूली हुई, और 402 ग्राहकों पर आरोप लगे।