शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस सरकारच्या बचतीमुळेच वीज दर कपात  :  चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 20:22 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या बचतीमुळेच आज वीज दरामध्ये कपात करणे शक्य झाले आहे, असे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले असून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने नुकत्याच वीजदरात कपात करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

ठळक मुद्देगेल्या पाच वर्षातील खर्च कपात व बचतीतून दर कमीवीज नियामक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या बचतीमुळेच आज वीज दरामध्ये कपात करणे शक्य झाले आहे, असे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले असून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने नुकत्याच वीजदरात कपात करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. वीज दर कमी करण्याबाबतची ही याचिका आयोगाकडे भाजपा सरकारच्या काळातच दाखल करण्यात आली होती आणि २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या कालावधीतील कामगिरीचे मूल्यमापन करून आयोगाने हा निर्णय दिला आहे, असे सांगताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, वीज कमी दरात खरेदी करता यावी, यासाठी महावितरणने गेल्या ५ वर्षांत अनेक व्यवस्था उभ्या केल्या. आयोगाने आपल्या आदेशात ज्याचा उल्लेख केला त्यात, ‘मेरिट ऑर्डर डिसपॅच’ यंत्रणेचा अवलंब केल्यामुळे महागड्या वीज खरेदीला पायबंद घालण्यात आला. एकूण खर्चात ८० टक्के वाटा हा वीजखरेदीचा असल्याने ही महत्त्वपूर्ण सुधारणा आहे. गेल्या ५ वर्षांत अनेक उपाय करण्यात आले. त्यात विनिमय दर अधिक असताना कोयनेच्या वीजनिर्मितीवर भर, सौर उर्जेच्या क्षेत्रात करण्यात आलेली लक्षणीय वाढ, त्याची औष्णिक वीजेपेक्षा कमी किंमत, हाऊसिंग सोसायटींमध्ये सोलर उपकरणांचा आग्रह केल्यामुळे सुद्धा मोठा लाभ झाला. यामुळे प्रतियुनिट विजेचा दर कमी करण्यात यश आले. चारही विभागांमध्ये यंत्रणेचे विकेंद्रीकरण करण्यात आले.प्रत्येक बाबतीत स्पर्धात्मक निविदेचा आग्रह धरण्यात आल्याने यातून सुमारे २४ हजार कोटींची बचत झाली. भांडवली खर्च कमी करता आले. ‘रिटर्न ऑन इक्विटी’ ही १५ टक्क्यांऐवजी केवळ ७.५ टक्के राहिली, यातून सुमारे ९५०० कोटींची बचत झाली. एजी कन्झम्पशनच्या माध्यमातून वार्षिक १००० कोटींची बचत झाली.या सर्वांचा परिणाम असा झाला की, खर्चात कपात आणि निरनिराळ्या माध्यमातून बचत केल्याने इतिहासात प्रथमच महावितरण कंपनीला २०१८-१९ मध्ये पहिल्यांदा उत्पन्न झाले आणि कंपनीने आयकराचा भरणा केला. २०१८-१९ मध्ये केंद्रीकृत पद्धतीने आयटी बिलिंग सुरू करण्यात आले. यामुळे महसुलात वाढ करणे शक्य झाले. या सर्व आधारावरच आयोगाने वीज दर कमी करण्याचा आदेश दिला, याचे आपण स्वागत करतो आणि वेळोवेळी केलेल्या योग्य मार्गदर्शनाबद्दल आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. त्या काळात माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे सुद्धा मी अभिनंदन करतो, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेelectricityवीजbillबिल