शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक हरले, पण मनं जिंकली; शेळकेंनी घातला दटकेंना हार, कोहळेंनी भरवला ठाकरेंना पेढा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:34 IST

Nagpur Vidhan Sabha Election Results 2024 : कृतीतून राजकीय आदर्श घालून दिला

कमलेश वानखेडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एखादी निवडणूक हरली की अनेकजण मनात रोष धरून ठेवतात, पण भाजपचे माजी आ. सुधाकर कोहळे व काँग्रेसचे बंटी शेळके यांनी मनाचा मोठेपणा दाखविला. ज्यांच्या विरोधात निवडणूक हरले त्यांच्याच घरी पोहोचत अभिनंदन केले. शेळके यांनी हार घालून आ. प्रवीण दटके यांचे स्वागत केले, तर कोहळे यांनी आ. ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांना पेढा भरवत विजयासाठी अभिनंदन केले.

मध्य नागपुरातील निवडणुकीत प्रवीण दटके व बंटी शेळके यांच्या समर्थकांतील वादांमुळे चांगलीच गाजली. एक-दोन प्रसंगांमुळे तणावही निर्माण झाला. मतदानाच्या दिवशी दोन गटांत हाणामारी होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे दोन युवा नेत्यांमधील हे राजकीय वैमनस्य पुढे कायम राहील, अशी चर्चा रंगू लागली होती. पण, शनिवारच्या निकालानंतर रविवारी बंटी शेळके यांनी दटके यांची भेट घेतली. शाल व हार घालून त्यांचे स्वागत केले. स्वतःच्या हाताने पेढा भरविला व पाया पडून त्यांचे आशीर्वादही घेतले. शेळके यांनी दटके यांच्या सर्व समर्थकांचीही गळाभेट घेतली. हा प्रसंगी उपस्थितांना भावुक करणारा ठरला. 

पश्चिम नागपुरातील जाहीर सभेत भाजपचे उमेदवार माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी आ. विकास ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे कोहळे यांच्याबाबत ठाकरे समर्थकांमध्ये कटुता निर्माण झाली होती. पण, निकालानंतर रविवारी कोहळे हे आ. विकास ठाकरे यांच्या घरी पोहोचले. त्यांनी बुके देऊन ठाकरे यांचे स्वागत केले. पेढा भरविला व गळाभेट घेतली. यावेळी ठाकरे कुटुंबीयांनीही त्यांचे स्वागत केले. या प्रसंगामुळे प्रचारातील कटुता क्षणात विरल्याचे पाहायला मिळाले. शेळके व कोहळे या दोन्ही नेत्यांनी आपल्या कृतीतून राजकीय आदर्श घालून दिला. ते हरले पण, त्यांनी अनेकांची मनं जिंकली. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024nagpurनागपूरVikas Thackreyविकास ठाकरेBJPभाजपाcongressकाँग्रेस