शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
3
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
4
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
5
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
6
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
7
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
8
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
9
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
10
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
11
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
12
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
13
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
14
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
15
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
16
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
17
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
18
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
19
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
20
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरातील पाच घाटावर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 12:35 IST

नागपूर शहरातील अंबाझरी घाटावर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्यात येते. आता यात पुन्हा चार दहन घाटांची भर पडली आहे.

ठळक मुद्देदहनासाठी मोक्षकाष्ठ मोफतमनपाच्या खर्चात बचत होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील अंबाझरी घाटावर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्यात येते. आता यात पुन्हा चार दहन घाटांची भर पडली आहे. या दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी मोफत मोक्षकाष्ठ उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. मात्र अंत्यसंस्कारासाठी लाकडे हवी असल्यास यासाठी पैसे मोजावे लागणार आहे.गेल्या वर्षी स्थायी समितीच्या बैठकीत चार दहन घाटावर अंत्यसंस्कारासाठी मोक्षकाष्ठ उपलब्ध करण्याला मंजुरी देण्यात आली होती. महापालिका प्रशासनाने यासंबंधीचे आदेश नुकतेच जारी केले आहे. पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेणाऱ्या व बायोकोल पुरवठा करणाºया संस्थेला मोक्षकाष्ठ पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.शहरातील सर्व दहन घाटावर महापालिकेतर्फे मोफत लाकडे व गोवऱ्या उपलब्ध केल्या जातात. पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार व्हावेत, यासाठी अंबाझरी घाटानंतर मानकापूर, मानेवाडा, सहकारनगर व मोक्षधाम या घाटावर मोक्षकाष्ठ उपलब्ध क रण्यात येणार आहे. यासाठी दहनघाटावर आवश्यक सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. पिंजऱ्यात गोवऱ्या व मोक्षकाष्ठ (बायोमास ब्रिकेट किंवा बायोकोल) या दहन सामुग्रीचा वापर करून अंत्यसंस्कार करण्यात येतील.धामिंक भावना विचारात घेता मोफत मोक्षकाष्ठ उपलब्ध असूनही कुणी अंत्यसंस्कारासाठी लाकडाची मागणी केल्यास यासाठी शुल्क आकारून लाकडे उपलब्ध करण्याची व्यवस्थाही राहणार आहे. परंतु पर्यावरणाचा विचार करता नागरिकांचा मोक्षकाष्ठाचा वापर करण्याला मिळेल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.

लाकडावरील खर्चात बचतशहरातील दहन घाटावर महापालिकेकडून लाकडाचा मोफत पुरवठा केला जातो. यासाठी एका अंत्यसंस्कारावर २२११ रुपये खर्च येतो. सर्व घाटावर वर्षाला ८ ते १० कोटींचा खर्च केला जातो. मात्र बायोकोल किंवा बायोमास ब्रिकेटचा वापर करून अंत्यसंस्कार केल्यास १७५० रुपये खर्च येणार आहे. म्हणजेच एका अंत्यसंस्कारावर ४६१ रुपयांची बचत होणार आहे. पाच दहन घाटावरील प्रतिसाद विचारात घेता, शहरातील अन्य घाटावरही मोक्षकाष्ठ उपलब्ध करण्याचा महापालिकेचा विचार आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण