शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

डम्परची सुमोला धडक; तिघे ठार

By admin | Updated: July 18, 2014 01:03 IST

कोळसा वाहून नेणाऱ्या डम्परने विरुद्ध दिशेने येणाऱ्या टाटा सुमोला जोरदार धडक देत फरफटत नेले. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, अन्य तिघे गंभीर जखमी झाले.

तिघे गंभीर जखमी : मकरधोकडा कोळसा खाणीतील घटनाउमरेड : कोळसा वाहून नेणाऱ्या डम्परने विरुद्ध दिशेने येणाऱ्या टाटा सुमोला जोरदार धडक देत फरफटत नेले. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, अन्य तिघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये अभियंत्याचा समावेश आहे. ही घटना उमरेड तालुक्यातील मकरधोकडा येथील खुल्या कोळसा खदानीतील वळणावर गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.अभियंता अशोक शामराव बुर्रेवार (५०, रा. नागपूर), प्रमोद शंकर नगराळे (४७, रा. ड्रीम सिटी, उमरेड) अशी मृतांची नाव असून, अजय खंगार, देवेंद्र सिंह व सुमोचा चालक राजू तुरातुरी अशी जखमींची नावे आहेत. बुर्रेवार हे बीईएमएल कंपनीमध्ये अभियंतापदी कार्यरत होते.हे सर्व जण एमएच-४०/एन-७०३० क्रमांकाच्या टाटा सुमोने खुल्या खदानीमध्ये कामगारांना घेऊन जात होते. दरम्यान, मोठा व उंच डम्पर याच खदानीतून कोळसा घेऊन बाहेर येत होता. खदानीतील रत्याच्या वळणावर डम्परने सुमोला धडक दिली. एवढेच नव्हे तर, ही सुमो अंदाजे १० फूट फरफटत नेली. धडक लागल्याचे लक्षात येताच अजय, देवेंद्र व राजू यांनी सुमोतून बाहेर उड्या टाकल्या. यात ते गंभीर जखमी झाले. मात्र, अभियंता बुर्रेवार व प्रमोद नगराळे या दोघांचा चिरडल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. तिन्ही जखमींना उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले. यांनी भेट दिली. दरम्यान, सायंकाळी वेकोलिचे महाव्यवस्थापक गुप्ता यांनी घटनास्थळाला भेट दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी एस. राजपूत, ठाणेदार संजय पवार, कॉन्स्टेबल रत्नाकर बमनोटे, सुधीर ज्ञानबोनवार व सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना नागपूरला रवाना करून कारवाई पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)