शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पोल नसल्याने गावात अंधार

By admin | Updated: July 3, 2014 00:58 IST

वाढत्या लोकसंख्येसोबतच गावात निर्माण होणाऱ्या नवीन वस्त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. परंतु अशा वस्त्यांना वीज पुरवठा करण्यासाठी सादर केलेले सहा हजार प्रस्ताव महावितरण

जिल्हा परिषद : महावितरणकडे हजारो प्रस्ताव प्रलंबितनागपूर : वाढत्या लोकसंख्येसोबतच गावात निर्माण होणाऱ्या नवीन वस्त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. परंतु अशा वस्त्यांना वीज पुरवठा करण्यासाठी सादर केलेले सहा हजार प्रस्ताव महावितरण कंपनीकडे प्रलंबित असल्याने अनेक गावातील लोकांना रात्रीला अंधाराचा सामना करावा लागतो.गावातील लोकांच्या मागणीनुसार पोल उभारण्यासाठी ग्रामपंचायत जि.प.च्या पंचायत विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करतात. जिल्ह्यातून येणारे प्रस्ताव स्थायी समितीची मंजुरी घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फ त महावितरणकडे कार्यवाहीसाठी पाठविले जातात. यात प्रामुख्याने पोल उभारणे, स्ट्रीट लाईट फेज टाकणे व स्ट्रीट लाईट मीटर टान्सफार्मर आदी कामांचा समावेश असतो. स्थायी समितीच्या प्रत्येक बैठकीत अशा स्वरूपाच्या प्रस्तावांना मंजुरी दिली जाते. परंतु समितीला नाहरकत प्रमाणत्र देण्याचेच अधिकार आहे. पुढील कार्यवाही महावितरणला करावयाची आहे. परंतु निधी नसल्याने २००७ सालापासून प्रस्ताव प्रलंबित आहे. यात दर महिन्याला नवीन प्रस्तावांची भर पडत आहे. रात्रीच्या अंधारामुळे ग्रामीण भागात चोऱ्या वाढल्या आहेत. तसेच अवैध दारू विक्री होत असल्याने गुन्हेगारी वाढत असल्याच्या तक्र ारी आहे. (प्रतिनिधी)शासनाकडून निधी नाहीनवीन पोल उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने महावितरणला निधी उपलब्ध करणे गरजेचे आहे. परंतु या दृष्टीने नियोजन होत नसल्याने निधी उपलब्ध होत नाही. त्यातच गावातील अंधार दूर करण्यासाठी आमदारही आग्रही नसतात. त्यांचा जोर रस्ते व तीर्थक्षेत्र विकासावर असल्याचे चित्र आहे.शासनाकडे पाठपुरावानवीन वस्त्यातील अंधार दूर करण्यासाठी ग्रामपंचायतींच्या प्रस्तावानुसार पोल उभारण्याची गरज आहे. मागणीनुसार शासनाने निधी उपलब्ध करावा. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जि.प.चे उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी दिली.