शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भीतीमुळे मांत्रिकाची सहकारी महिला भूमिगत

By admin | Updated: July 16, 2014 01:12 IST

तालुक्यातील अमितनगर येथे अंधश्रद्धेतून शंकर पिंपळकर या मांत्रिकाला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर गावात अद्यापही तणावपूर्ण वातावरण आहे.

कुटुंब भयभीत : गावाला आले पोलीस छावणीचे स्वरूपबल्लारपूर: तालुक्यातील अमितनगर येथे अंधश्रद्धेतून शंकर पिंपळकर या मांत्रिकाला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर गावात अद्यापही तणावपूर्ण वातावरण आहे. दरम्यान, गावकऱ्यांकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने जादूटोणा करण्यासाठी शंकरला सहकार्य करीत असल्याचा आरोप असलेली महिलादेखील दोन दिवसांपासून गावातून बेपत्ता झाली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने या गावाला भेट दिली असता, गावात तणावपूर्ण शांतता होती.खबरदारीचा उपाय म्हणून गावात दोन दंगा नियंत्रण पथकांसह मोठ्या प्रमाणावर पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे. अंधश्रद्धेने पछाडलेल्या गावकऱ्यांना शंकरच्या मृत्यूचे समाधान आहे. त्याला याकामी मदत करणाऱ्या महिलेलाही ठार मारण्याच्या धमक्या गावकऱ्यांकडून मिळत असल्याने भयभीत झालेली ती महिला गावातून निघून गेली आहे. ती नेमकी कुठे गेली, हे कुणालाच माहीत नसले तरी पोलिसांनीच तिला सुरक्षितस्थळी ठेवले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मृतक शंकर पिंपळकरचे अन्य दोन भाऊ अमितनगरमध्येच राहतात. रविवारी शंकरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्याचा एक भाऊ अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हता. त्यानेही गावकऱ्यांचीच बाजू घेतल्याची बाब समोर आली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने मृत शंकरच्या घराला भेट दिली असता, घराच्या दाराला कुलुप दिसले. चौकशी केली असता, शंकरची पत्नी कुठे गेली हे माहित नसल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)शंकर पिंपळकरच्या बंदोबस्तासाठी ३०० रुपये वर्गणीअंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेल्या अमितनगरवासियांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून आंध्र प्रदेशातील मांत्रिकाच्या एका टोळीला गावात पाचारण केले होते. शंकर पिंपळकर व त्याची एक महिला साथीदार जादुटोणा करीत असल्याचा दावा या टोळीने केला होता. त्यातून बाहेर काढण्यासाठी मोठा खर्च असल्याचे या टोळीने गावकऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार, गावकऱ्यांनी प्रत्येक कुटुुंबाकडून ३०० रुपये लोकवर्गणी गोळा केली होती. त्यातील काही रक्कम मांत्रिकाच्या टोळीला देण्यात आली. मात्र त्या टोळीचे नाव सांगण्यास कुणीही तयार नाही.