शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांनो... ई चालान भरा. अन्यथा .... २६४१२ वाहनचालकांना नोटीस, ३ कोटी ६८ लाख रुपये थकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 00:00 IST

Traffic News: वारंवार सूचना अन् पत्र पाठवूनही वाहनचालक ई चालान भरण्यास तयार नसल्याने पोलिसांनी आता अशा वाहनचालकांची केस लोक अदालतीत ठेवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

नागपूर - वारंवार सूचना अन् पत्र पाठवूनही वाहनचालक ई चालान भरण्यास तयार नसल्याने पोलिसांनी आता अशा वाहनचालकांची केस लोक अदालतीत ठेवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, शहर पोलिसांनी २६४१२ वाहनचालकांना नोटीस पाठविलेली आहे.

वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २६४१२ वाहनचालकांविरुद्ध वर्षभरात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दंडात्मक स्वरूपाची कारवाई केली. या सर्वांना वारंवार सूचना करूनही त्यांनी सरकारी कोषागारात ई चालानची थकित रक्कम जमा केलेली नाही. या वाहनधारकांकडे पोलिसांचे ई चालानच्या रुपातील ३ कोटी ६८ लाख रुपये थकित आहे. अशांना पोलिसांनी जिल्हा विधी प्राधिकरणाच्या माध्यमातून १ मार्च ते २१ ऑगस्टपर्यंत नोटीस पाठविलेली आहे. वाहनधारकाच्या मोबाईलवर मेसेजच्या रुपातही ही नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यांना त्यांच्याकडे थकित असलेली ई चालानची रक्कम २१ सप्टेंबरपर्यंत जमा करण्याची सूचना करण्यात आली आहे. नमूद मुदतीपर्यंत ही रक्कम जमा केली नाही तर संबंधित वाहनचालकांना २५ सप्टेंबरला होणाऱ्या लोक अदालतीत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तेथे वाहनधारकाने समाधानकारक बाजू मांडली नाही तर दंडाची रक्कम वसुल करण्यासाठी पोलिसांकडून संबंधितांचे वाहन जप्त करण्याची कारवाई केली जाऊ शकते. आरोप, वाद टाळण्यासाठीवाहतूकीचे नियम मोडणाऱ्यासोबत वाहतूक शाखेच्या पोलिसांचे नेहमी वाद व्हायचे. नंतर आरोप प्रत्यारोपही व्हायचा. अनेकदा पोलिसांवर वाहनचालकांकडून गंभीर स्वरूपाचे आरोप केले जायचे. व्हिडीओही व्हायरल केले जायचे. हे सर्व टाळण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ई चालानच्या कारवाईवर भर देण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यात पोलिसांशी वाद घालण्याच्या, मारहाणीच्या घटना जवळपास बंद झाल्या आहेत, हे विशेष।

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnagpurनागपूर