शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेची नाट्यस्पर्धा ‘ऑनलाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 11:37 IST

रंगकर्मींमधील ऊर्जा कायम राहावी या हेतूने अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेने ‘ऑनलाईन’ नाट्यस्पर्धेची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देवर्धापनदिनाच्या पर्वावर व्हिडीओच्या माध्यमातून रंगणार स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे सर्वच कलावंत घरात कुलूपबंद झाले आहेत. नाटकाच्या तालमी थांबल्या आहेत, प्रयोग रद्द झाले, अनेक स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर १००वे नाट्य संमेलनही पुढे ढकलण्यात आले आहेत. अशात रंगकर्मींमधील ऊर्जा कायम राहावी या हेतूने अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेने ‘ऑनलाईन’ नाट्यस्पर्धेची घोषणा केली आहे.नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचा वर्धापन दिन सोहळा १४ एप्रिल रोजी साजरा करण्यात येत असतो. यंदा हा सोहळा कोरोना संकटामुळेच स्थगित करण्यात आला आहे. मात्र, थांबेल तो रंगकर्मी कसला, या नात्याने नागपूर शाखेने ऑनलाईन नाट्यस्पर्धेची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे घरात कुलूपबंद अवस्थेत असलेल्या रंगकर्मींमध्ये उत्साह संचारला आहे. ‘संकल्पना आमची आविष्कार तुमचा’ या कल्पनेंतर्गत घरी राहूनच नाट्यस्पर्धेत सहभागी होण्याची संधी रंगकर्मींना मिळाली आहे. याची टॅगलाईनच ‘घरबसल्या जोपासू... वारसा कलेचा’ अशी आहे. नाट्य परिषदेचे पदाधिकारी प्रफुल्ल फरकसे, नरेश गडेकर, संजय रहाटे, किशोर आयलवार यांनी ही संकल्पना सादर केली आहे. यात कलावंतांनी व्हिडिओद्वारे पाच ते सात मिनिटाच्या आपल्या सादरीकरणाचे चित्रिकरण करून पाठवायचे आहे. यात एकपात्री, नाट्यछटा आणि स्वगत रंगकर्मींना मोबाईलमध्ये चित्रिकरण करून पाठवता येणार आहे. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम मुदत १४ एप्रिल आहे. या स्पर्धेसाठी कुठलीही प्रवेश फी घेण्यात येणार नाही. हे चित्रीकरण घरातीलच असावे. ही स्पर्धा महाराष्ट्र स्तरावर आयोजित करण्यात आली आहे. विजेता स्पर्धकास रोख पारितोषिके व स्मृतिचिन्ह तसेच सहभागी कलावंतांना प्रमाणपत्र पुरस्कार वितरण सोहळ्यात देण्यात येईल, अशी माहिती नरेश गडेकर, किशोर आयलवार, संजय रहाटे यांनी दिली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस