शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर पुतळा लोकार्पणाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: November 22, 2015 03:08 IST

जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला.

जिल्हा परिषद : आता मुख्यमंत्र्यांच्या वेळेसाठी पत्रव्यवहार नागपूर : जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. अनेक वर्षानंतर पुतळा बसवण्यातही आला. परंतु पुतळा बसवण्यासाठी राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली नसल्यामुळे पुतळ्याचे लोकार्पण रखडले होते. अखेर १९ नोव्हेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यास सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी प्रदान केली असून परवानगी पत्र जारी केले आहे. आता लोकार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख मिळावी यासाठी पत्रव्यवहार सुरू झाला आहे. तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश मानकर यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी १२ वर्षांनी झाली. पुतळा बसविण्यासाठी राज्य शासनाकडून परवानगी घेणे आवश्यक होते. जि. प. प्रशासनाने वारंवार पत्रव्यवहार करूनही परवानगी मिळाली नव्हती. सध्याचे समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांनी पूर्णाकृती पुतळा तयार करण्यासाठी मूर्तिकाराकडे रेटा लावला. समाजकल्याण समितीच्या सर्व सदस्यांनी पुतळ्याची पाहणी केली. त्यानंतर गेल्या महिन्यात प्रशासकीय इमारतीसमोर पुतळा बसविण्यात आला. याशिवाय पुतळ्याचा चबुतरा तयार करून त्या ठिकाणी सौंदर्यीकरणही करण्यात आले होते. परंतु शासनाची परवानगी नसल्यामुळे पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण अडकले होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला. स्वत: शासनाकडे पत्रव्यवहार केला. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने १९ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोर डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यास परवानगी दिली. यासंदर्भातील सामान्य प्रशासन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावा, अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून तारीख मागण्याबाबत प्रशासनाने पत्रव्यवहार सुरूकेला आहे.