शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी हत्याकांड;पाच गजाआड

By admin | Updated: November 22, 2015 03:05 IST

इंद्रप्रस्थनगरातील दुहेरी हत्याकांडात सोनेगाव पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली.

सोनेगाव पोलिसांची कारवाई : अनैतिक संबंधाचा वाद नागपूर : इंद्रप्रस्थनगरातील दुहेरी हत्याकांडात सोनेगाव पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली. कैलाश सुरेश भारद्वाज (वय २७), संजय ऊर्फ सोनू कुलसिंह भारद्वाज (वय २०), छोटेलाल ऊर्फ छोटू शिवजी महंतो (वय ३०), प्रतिक ऊर्फ बाबी राहुल सहारे (वय २२) आणि महेश ऊर्फ सिबलू राजेश नायडू अशी या आरोपींची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या सात झाली आहे. मंगळवारी रात्री इंद्रप्रस्थनगरातील रेल्वेच्या डम्पिंग यार्डजवळ बंटी ऊर्फ संदीप शरद आटे (वय २५, रा. तुकडोजीनगर) आणि रवी प्रकाश टुले (वय २६, रा. गोपालनगर) या दोघांची निर्घृण हत्या झाली होती. बुधवारी सकाळी हे दुहेरी हत्याकांड उघडकीस आल्यानंतर ठाणेदार अरुण जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने आरोपी मनोजला अटक केली. त्याने या दुहेरी हत्याकांडाची कबुली दिली. रवीच्या प्रेयसीने दिलेल्या दुचाकीवरून वाद झाल्यामुळे हत्याकांड घडल्याचे त्याने सांगितले.रवीचे एका विधवा महिलेशी अनैतिक संबंध होते. तिने रवीला प्लेझर दिली. रवीने ही दुचाकी मनोजला वापरायला दिली. मनोजकडून दुचाकी परत घेतल्यानंतर ती गहाण ठेवली. हा प्रकार मनोजने रवीच्या प्रेयसीला सांगितला. त्यामुळे रवीवर त्याची प्रेयसी भडकली. तिने दुचाकी परत मिळवण्यासाठी रवीमागे तगादा लावला. दुचाकी गहाण ठेवल्याची माहिती मनोजने प्रेयसीला सांगितल्याचा आणि तो आपल्या प्रेयसीच्या संपर्कात असल्याचा रवीला संशय आला. मंगळवारी रात्री नेहमीच्या ठिय्यावर रवी, बंटी, मनोज, कैलास, संजय, छोटेलाल, प्रतिक आणि महेश हे सात जण दारू पीत बसले. रवीने ‘दुचाकी आणि प्रेयसी‘चा विषय काढताच त्याचे मनोजसोबत भांडण झाले. मनोजने सिमेंटची फळी उचलून रवीकडे धाव घेताच बंटी मध्ये आला. त्यामुळे मनोजने रवीला सोडून सिमेंटची फळी बंटीच्या डोक्यात घातली. त्यानंतर रवीला दगडाने ठेचले त्याने या दुहेरी हत्याकांडाची माहिती सर्वांनाच होती. मात्र, कुणीही पोलिसांना कळविले नाही. एकटा मनोज दोघांची हत्या करू शकत नाही, असा संशय आल्यामुळे पोलिसांनी गुरुवारी शहारेला तर, शुक्रवारी उपरोक्त पाच आरोपींना अटक करून त्यांचा पीसीआर मिळवला. (प्रतिनिधी)