शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

उपराजधानीत घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:29 AM

नागपूर शहर आणि जिल्ह्यात सबसिडीच्या घरगुती सिलिंडरचा सर्रास काळाबाजार होत आहे.

ठळक मुद्देदलालांची टोळी सक्रियसबसिडीचे सिलिंडर एक हजारात

आशीष दुबे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या सबसिडीच्या घरगुती गॅस सिलिंडरची कोणताही ‘वेटिंग लिस्ट’ नाही. ग्राहकाने केव्हाही सिलिंडरची नोंदणी करावी आणि घरी न्यावे, असा दावा शहर आणि जिल्ह्यातील गॅस सिलिंडर एजन्सीच्या संचालकांचा आहे. त्यानंतरही अनेक ग्राहकांना सिलिंडरकरिता पाच ते सहा दिवसांची वाट पाहावी लागत आहे.‘लोकमत’ने या प्रकरणाची तपासणी केली. त्यात अनेक आश्चर्यजनक बाबी पुढे आल्या आहेत. त्यानुसार शहर आणि जिल्ह्यात सबसिडीच्या घरगुती सिलिंडरचा सर्रास काळाबाजार होत आहे. दुसरीकडे ग्राहकांना सिलिंडरसाठी अनेक दिवस वाट पाहावी लागत आहे. केंद्र सरकारने सबसिडीच्या घरगुती सिलिंडरचा काळाबाजार थांबविण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.आॅनलाईन बुकिंग पद्धत सुरू केली. त्यानंतरही नागपूर शहर आणि जिल्ह्यात दलालांची टोळी सक्रिय असून सबसिडीच्या घरगुती सिलिंडरचा सर्रास काळाबाजार करीत आहे. जिल्हा प्रशासन आणि गॅस कंपन्यांनी आतापर्यंत कोणत्याही दलालावर कारवाई केलेली नाही. काळाबाजार करणाऱ्या दलालांची मोठी साखळी आहे. दलालांची टोळी सिलिंडरचा पुरवठा करणाºया गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांसोबत संगनमत करून या बाबी प्रत्यक्षात आणत आहेत. या संदर्भात काही गॅस एजन्सीच्या संचालकांनुसार, गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आॅनलाईन झाली आहे. अशा स्थितीत सबसिडीच्या घरगुती सिलिंडरचा काळाबाजार होणे शक्य नाही. पण सत्य स्थिती अशी आहे की, दलालांची टोळी संघटितरीत्या हे काळेकृत्य पूर्णत्वास नेत आहे.

८५२ रुपयांचे सिलिंडर मिळते एक हजारातसबसिडीचे घरगुती गॅस सिलिंडर ८५२ रुपयात तर व्यावसायिक गॅस सिलिंडर १४०० ते १५०० रुपयात मिळते. पैशाची बचत करण्यासाठी अनेक हॉटेल्स, चहाटपरी, ढाबा, लग्न व समारंभात कॅटरिंगचे कंत्राट घेणारे दलालांसोबत संपर्क साधतात. त्यांना घरगुती गॅस सिलिंडर एक हजार ते ११०० रुपयात मिळते. त्यांची पैशाची बचत होते.त्यामुळे दलालांसोबत संपर्क साधणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याची प्रकरणे पुढे न आल्याने या काळाबाजारीचा खुलासा होऊ शकला नाही.दलाल याचाच फायदा घेतात. त्यांना सबसिडीचे पैसे मिळवून देण्याची बतावणी करतात. त्यांच्या नावावर गॅस सिलिंडरचे बुकिंग करतात. सबसिडीची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर त्यातील काही वाटा ज्यांच्या नावावर सिलिंडरची बुकिंग करण्यात येते, त्यांना देण्यात येतो. उर्वरित पैसे दलाल आपल्याकडे ठेवतात. सर्वसाधारणपणे एक दलाल दररोज १० ते १५ सिलिंडरची दलाली करतो. लग्न व समारंभाच्या दिवसात दलाल २० ते २५ सिलिंडरचा काळाबाजार करतो.

गरीब व मजुरांच्या नावावर बनतात कार्डसबसिडीचे गॅस सिलिंडर खरेदीसाठी ग्राहकाला गॅस कंपनीच्या एका मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून एलपीजी सिलिंडरची बुकिंग करावी लागते. सिलिंडर मिळाल्यानंतर ग्राहकाला रक्कम चुकती करावी लागते. सबसिडीची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होते. अनेक गरीब आणि मजूर आहेत की त्यांना गॅस सिलिंडरची आवश्यकता नसते.सिलिंडर बॉयला माहीत असते सिलिंडर पोहोचविण्याचे ठिकाणयाप्रकारे अवैध व्यवहार विनाझंझट सहजरीत्या पूर्ण केले जातात. सिलिंडर कुणाच्याही पत्त्यावर असो, पण दलालाचा आर्थिक व्यवहार ज्यांच्यासोबत होतो, त्यांच्याच घरी सिलिंडर पोहोचतो. सिलिंडरच्या बुकिंगनंतर डिलिव्हरी करताना सिलिंडर कोणत्या पत्त्यावर पोहोचवायचे आहे, याची परिपूर्ण माहिती एजन्सीचे कर्मचारी अर्थात सिलिंडर बॉयला असते. दलालाचे सिलिंडर खºया ग्राहकाच्या घरी न पोहोचता दलालाने आर्थिक व्यवहार केलेल्याच्या घरी पोेहोचते.सहजपणे पूर्णत्वास नेतात काममाहितीनुसार दलाल घरगुती सिलिंडर आपल्या घरी वा कोणत्याही सुरक्षित ठिकाणी स्टोर करून ठेवतात. कारवाईचा अंदाज पाहता सर्व सिलिंडरला एका ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतात. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी एक वा दोन सिलिंडर ठेवतात.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर