शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

गुंडांच्या दहशतीचे ना सावट ना भीती

By admin | Updated: November 12, 2014 00:56 IST

आता येथील आकाश स्वच्छ आहे. अंगण मोकळे आहे. ना गुंडाच्या दहशतीचे सावट ना अत्याचाराची भीती. आता इकडेही महिला-मुली मोकळेपणाने फिरू शकतात. छोटी मुलं रस्त्यावर खेळू शकतात.

कस्तुरबा नगर निवांत : आता येथील आकाश स्वच्छ आहेनागपूर : आता येथील आकाश स्वच्छ आहे. अंगण मोकळे आहे. ना गुंडाच्या दहशतीचे सावट ना अत्याचाराची भीती. आता इकडेही महिला-मुली मोकळेपणाने फिरू शकतात. छोटी मुलं रस्त्यावर खेळू शकतात. सायकल चालवू शकतात अन् पतंगही उडवू शकतात. तरुण बिनधास्त कुठेही उभे राहून गप्पा करू शकतात. १० वर्षांपूर्वी असे नव्हते. कुख्यात अक्कू आणि त्याचे गुंड साथीदार कुणालाही मारहाण करून त्याच्या खिशातील रक्कम हिसकावून घ्यायचे. रस्ताच काय, अंगणातून आणि अनेकदा घरात शिरून महिला मुलीला उचलून न्यायचे. तिच्यावर सामूहिक बलात्कार करायचे. विरोध केल्यास जीवघेणी मारहाण करायचे. वस्तीत विवस्त्र फिरवण्याची तर अक्कूला विकृतीच जडली होती. छोट्या मुलांना रस्त्यावर खेळण्याची, धावण्या-बागडण्याची मुभा नव्हती. सायकली हिसकावून मुलांना मारहाण केली जात होती. गप्पा करताना दिसलेल्या तरुणांना दारू आणायला, नेऊन द्यायला, प्यायला लावले जात होते. विरोध केल्यास भरवस्तीत बेदम मारहाण केली जात होती. एकूणच कस्तुरबानगरातील सर्वसामान्य नागरिकांचे कुख्यात अक्कूने जगणेच मुश्किल केले होते. त्याच्या या पापात जरीपटका ठाण्यातील काही पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी असल्याने गोरगरिबांचा आक्रोश निर्दयपणे चिरडला जात होता. एक दोन, पाच दहा नव्हे, तर अक्कू आणि त्याच्या साथीदारांनी तब्बल ४० महिला मुलींवर अत्याचार केले होते. अनेकींना त्यांच्या पालकांसमोरच अपमानित केले होते. त्यामुळे अक्कूविरोधात कस्तुरबानगरात असंतोष धगधगत होता. त्याचा अखेर भडका उडाला. १३ आॅगस्ट २००४ ला कुख्यात अक्कूला संतप्त जमावाने थेट न्यायमंदिराच्या कक्षातच ठेचले. त्याची हत्या झाल्यानंतर कस्तुरबानगरातील नागरिक बेभान झाले होते. प्रत्येकानेच या प्रकरणात स्वत:ला अटक करवून घेण्याची तयारी दाखवली होती. पोलिसांनी मात्र, २१ जणांना आरोपी केले होते. अक्कू हत्याकांडाचा निकालसोमवारी १० नोव्हेंबरला लागला. न्यायालयाने सर्वांना निर्दोष मुक्त केले.वेगळ्या आनंदाची अनुभूतीदहा वर्षांपूर्वी मनावर अक्कूच्या दहशतीचा दगड होता. तो मारला गेल्यानंतर दहशत कमी झाली. मात्र, मुलगी उषा आणि जावई विलास भांडे यात आरोपी म्हणून अडकल्यामुळे एक वेगळेच दडपण होते. तब्बल दहा वर्षे या दडपणात जगलो. सोमवारी निकाल लागल्यापासून मोकळा श्वास घेतो आहे. वेगळ्या आनंदाची अनुभूती आहे.सारे कसे बिनधास्तकस्तुरबानगरात निकालाचा दिवस एखाद्या सणोत्सवासारखा साजरा करण्यात आला. संपूर्ण वस्तीतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वर्गणी गोळा केली. डीजे लावला. मिठाई बोलवली. रात्री १.३० ते २.०० वाजेपर्यंत कस्तुरबानगरात जल्लोष सुरू होता. आज निकालानंतरचा दुसरा दिवस. या भागातील बहुतांश मंडळी आपल्या रोजीरोटीवर निघून गेली. मात्र, लहान मुले छान पतंग उडवत होती. सायकल चालवत होती. मुली, तरुणी मोकळेपणाने फिरत होत्या. तरुणांचे थवे गप्पा करीत होते. सारे कसे बिनधास्त होते.आनंदाला पारावार नाहीयाच वस्तीत लहानाची मोठी झाली. मात्र, दहा वर्षांपूर्वीचे ते दिवस आठवले की अंगावर काटाच उभा राहातो. अक्कू आणि त्याच्या साथीदारांची नजर कुणावरच पडू नये, यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करीत होतो. अखेर त्याची हत्या झाली अन् आम्ही सारेच आनंदलो. सोमवारी निकाल लागल्यापासून तर आनंदाला पारावारच उरला नाही.