शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

‘सूर ज्योत्स्ना’ राष्ट्रीय संगीत पुरस्काराचे आज वितरण  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 6:40 AM

सुमधूर आवाज आणि सांगितिक कौशल्याने महाराष्ट्रावर जादू करणाऱ्या ‘सा रे ग म प’ फेम आर्या आंबेकर व महान शास्त्रीय संगीत कलावंत तौफिक कुरेशी यांचे चिरंजीव शिखर नाद कुरेशी यांना यंदाच्या ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१९’ने गौरविण्यात येणार आहे.

नागपूर : सुमधूर आवाज आणि सांगितिक कौशल्याने महाराष्ट्रावर जादू करणाऱ्या ‘सा रे ग म प’ फेम आर्या आंबेकर व महान शास्त्रीय संगीत कलावंत तौफिक कुरेशी यांचे चिरंजीव शिखर नाद कुरेशी यांना यंदाच्या ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१९’ने गौरविण्यात येणार आहे.लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१९ चे वितरण आज शनिवारी, २३ मार्च रोजी नागपुरातील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सायंकाळी ६ वाजता होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा राहतील.संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभांच्या सन्मान सोहळ्याचे हे सहावे वर्ष आहे. देशभरातील संगीत प्रतिभांना शोधून त्यांना प्रोत्साहित करणे हा या पुरस्काराचा मूळ उद्देश असून मागच्या पाच वर्षात या मंचने अनेक कलावंतांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भावी वाटचालीकरिता प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे.आर्या आंबेकर, शिखर नाद कुरेशींना पुरस्काराने गौरविणारया भव्य समारंभात आपल्या सुमधूर आवाजाने महाराष्टÑावर जादू करणारी ‘सा रे ग म प’ फेम आर्या आंबेकर व महान शास्त्रीय संगीत कलावंत तौफिक कुरेशी यांचे चिरंजीव शिखर नाद कुरेशी यांना ‘सूर ज्योत्स्ना अवॉर्ड-२०१९’ने सन्मानित करण्यात येणार आहे.श्रेया घोषाल ‘लाईव्ह कॉन्सर्ट’चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह पाच फिल्मफेअर आणि २०१८ चा लोकमत महाराष्टÑीयन आॅफ दि इयर पुरस्कारप्राप्त गायिका श्रेया घोषाल यांचा ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ कार्यक्रम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र