शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यांना ११३४ पदव्यांचे हाेणार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST

नागपूर : विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (व्हीएनआईटी)चा १९ वा दीक्षांत समाराेह येत्या १५ सप्टेंबर राेजी आयाेजित करण्यात आला आहे. ...

नागपूर : विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (व्हीएनआईटी)चा १९ वा दीक्षांत समाराेह येत्या १५ सप्टेंबर राेजी आयाेजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच डीएसआयआरचे सचिव व वैज्ञानिक व औद्याेगिक संशाेधन परिषदेचे महासंचालक डाॅ. शेखर मांडे यांच्या उपस्थितीत संस्थेच्या सभागृहात हा समाराेह हाेणार असून पीएचडीधारकांसह व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यांना ११३४ पदव्यांचे वितरण हाेणार आहे.

व्हीएनआयटीचे संचालक डाॅ. प्रमाेद पडाेळे यांनी पत्रपरिषदेत याबाबत माहिती दिली. दुपारी १२.३० वाजता आभासी माेडवर समाराेह सुरू हाेईल. पदवी वितरणामध्ये ४९ विद्यार्थ्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, ३३३ विद्यार्थ्यांना मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, ६० विद्यार्थ्यांना डॉक्टर ऑफ सायन्स, विविध शाखेतील ६३४ पदवीधारकांना बॅचलर ऑफ टेक्नालॉजी आणि ५९ विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ आर्किटेक्चरची पदवी देऊन सन्मानित करण्यात येईल. याशिवाय संशाेधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना ४६ पदके आणि शैक्षणिक गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

डाॅ. पडाेळे यांनी सांगितले, काेराेना संक्रमण काळात संस्थेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी अनेक उल्लेखनीय कार्य केले आहे. तंत्रज्ञान विकसित करून एम्स व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला समर्पित केले. यासह सामाजिक जबाबदारी स्वीकारत संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनांनी नागरिकांना ऑक्सिजन व इतर वैद्यकीय उपकरणे वितरित केली. मागील वर्षी व्हीएनआयटीला ३४ पेटंट प्राप्त झाले आहेत.

अत्याधुनिक रुग्णालय सुरू करणार

संस्थेच्या परिसरात असलेल्या जुन्या रुग्णालयाचा कायाकल्प करून अत्याधुनिक रुग्णालयात रुपांतरित करण्यात येणार असल्याचे डाॅ. पडाेळे यांनी सांगितले. रुग्णालयात सर्व प्रकारच्या सुविधा तयार करण्यात आल्या असून डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना या रुग्णालयाची सुविधा मिळणार आहे.