शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी जन्मल्यामुळे निराश पती घटस्फोट मिळविण्यात अपयशी

By admin | Updated: July 29, 2015 03:09 IST

मुलगी जन्माला आल्यामुळे निराश झालेल्या पतीला घटस्फोट मिळविण्यात अपयश आले आहे.

हायकोर्टाची चपराक : पत्नीच्या वागणुकीतील क्रूरता सिद्ध झाली नाहीनागपूर : मुलगी जन्माला आल्यामुळे निराश झालेल्या पतीला घटस्फोट मिळविण्यात अपयश आले आहे. सुरुवातीला कौटुंबिक न्यायालयाने पतीची याचिका फेटाळली होती. या निर्णयाविरुद्ध पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील केले होते. उच्च न्यायालयानेही दिलासा नाकारला. यामुळे पतीला जोरदार चपराक बसली आहे.पतीने पत्नीची क्रूरता व विभक्ततेच्या आधारावर घटस्फोट मिळविण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याचवेळी पत्नीनेही वैवाहिक अधिकार जपण्यासाठी व पोटगी मंजूर करण्यासाठी दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. १० आॅगस्ट २०११ रोजी कौटुंबिक न्यायालयाने पतीची याचिका खारीज तर, पत्नीची वैवाहिक अधिकार जपण्याची याचिका मंजूर केली. तसेच, पत्नी व तिच्या मुलीला १० हजार रुपये महिना पोटगी मंजूर केली. या निर्णयाविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात अपील केले होते तर, पत्नीने पोटगी वाढवून देण्यासाठी प्रथम अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व प्रसन्न वराळे यांनी दोघांचेही अपील फेटाळून कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. राजेश व राजश्री (काल्पनिक नावे) यांचे १९ मे २००१ रोजी लग्न झाले होते. राजेश पुणेत नोकरी करतो. राजश्रीचे माहेर नागपूरचे आहे. राजश्रीला मुलगी झाल्यामुळे राजेश व त्याचे आई-वडील नाराज झाले होते. यामुळे राजेशने घटस्फोट मिळविण्यासाठी राजश्रीविरुद्ध काल्पनिक कथा रचली होती. राजश्रीने लग्नाच्या वेळी तिच्या हातावर पांढरे डाग असल्याचे लपवून ठेवले. लग्नानंतर चार वर्षांनी तिच्या हातावरील पांढरे डाग दिसून आले. राजश्रीची वागणूक क्रूरतापूर्ण असून ती सतत भांडण करते. कधी-कधी हिंसक होते. ती शयनकक्षाला आतून कुलुप लावून झोपत होती. शरीरसंबंध टाळत होती असे राजेशचे म्हणणे होते. परंतु, राजेशला त्याचे म्हणणे सिद्ध करण्यात अपयश आले. कौटुंबिक न्यायालयासह उच्च न्यायालयानेही त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही.राजेश व राजश्रीचे एका बँकेत जाईन्ट अकाऊंट होते. राजेशने १४ मार्च २००५ रोजी त्यातील सर्व रक्कम काढून घेतली. राजश्रीसोबत रहायचे असते तर त्याने असे केले नसते. त्याने राजश्रीला घरी आणण्यासाठी प्रयत्न केल्याचाही काहीच पुरावा नाही. बाळंतपणापूर्वी दोघांचे सबंध चांगले होते. मुलगी झाल्यानंतर परिस्थिती बदलली असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. (प्रतिनिधी)