शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

देसाई संभाळणार नागपूर कारागृह?

By admin | Updated: May 8, 2015 02:07 IST

पुण्यातील येरवडा कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांची नागपूर कारागृहाच्या अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे.

नागपूर : पुण्यातील येरवडा कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांची नागपूर कारागृहाच्या अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांनी तत्काळ नागपुरात रुजू व्हावे,असे बदलीच्या आदेशात नमूद आहे. मात्र, इतर अधिकाऱ्यांप्रमाणेच ते सुद्धा हा बदली आदेश फिरवण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.देसाई गेल्या तीन वर्षांपासून येरवडा कारागृहाचे अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्याच कार्यकाळात २६/११ चा जिवंत पकडला गेलेला आरोपी, पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला फासावर लटकवण्यात आले. अनेक दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीसह संजय दत्तसारखे सेलिब्रेटी आरोपीही देसार्इंच्या कार्यकाळात येरवड्यात शिक्षा भोगत आहेत. त्यांची एकूणच शैली बघता त्यांना नागपुरातील मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्याचा सरकारने निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी निघालेल्या आदेशात त्यांना तत्काळ नागपूरची सूत्रे स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, ते गुरुवार सायंकाळपर्यंत येथे पोहचले नव्हते. त्यांच्यापुर्वी यू.टी. पवार यांची नागपूर कारागृहाचे अधीक्षक म्हणून बदली झाली होती. मात्र, पवार यांनी ठाण्यातून धावपळ करीत बदली आदेश फिरवला. नागपूरऐवजी त्यांनी येरवड्याचा पदभार पदरात पाडून घेतला. पवार यांच्यापूर्वी अन्य सहा अधिकाऱ्यांनीही नागपूर कारागृहाची जबाबदारी स्वीकारण्याचे टाळले. तर, आता देसाईसुद्धा नागपूरऐवजी दुसऱ्या ठिकाणी बदली करून घेण्याचे प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बोलणी करण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर लोकमत प्रतिनिधीने वारंवार संपर्क केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.(प्रतिनिधी)