शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम अर्बनच्या अध्यक्षांच्या घराला ठेवीदार व खातेदारांचा घेराव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:55 IST

कोट्यवधींच्या ठेवी घेऊन फरार झालेले गणेशनगर येथील श्रीराम अर्बन क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे यांच्या नंदनवन, शिवनगर येथील घराला जवळपास १५० पेक्षा जास्त ठेवीदार आणि खातेदारांनी गुरुवारी रात्री घेराव घातला आणि निदर्शने केली. पोलिसांनी बळजबरीने आम्हाला हाकलून लावल्याचा आरोप ठेवीदारांनी लोकमतशी बोलताना केला.

ठळक मुद्देकोट्यवधींचा घोटाळा : ठेवीदारांचा आरोप

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : कोट्यवधींच्या ठेवी घेऊन फरार झालेले गणेशनगर येथील श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे यांच्या नंदनवन, शिवनगर येथील घराला जवळपास १५० पेक्षा जास्त ठेवीदार आणि खातेदारांनी गुरुवारी रात्री घेराव घातला आणि निदर्शने केली. पोलिसांनी बळजबरीने आम्हाला हाकलून लावल्याचा आरोप ठेवीदारांनी लोकमतशी बोलताना केला.प्राप्त माहितीनुसार, सोसायटीत मजुरापासून श्रीमंतांचे कोट्यवधी रुपये गुंतले आहेत. मेहरकुरे यांनी ठेवीदार आणि खातेदारांच्या पैशातून अवैध जमिनी विकत घेतल्या असून अन्य व्यवसायातही गुंतवणूक केली आहे. त्यांना योग्य परतावा न मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे फसले आहेत. याची माहिती ठेवीदारांना झाल्यानंतर पैसै काढण्यासाठी अध्यक्षांशी संपर्क साधला. पैसे परत करतो, अशा भूलथापा चार महिन्यांपासून देऊन ते ठेवीदारांची बोळवण करीत आहेत. एक महिन्यांपूर्वी जवळपास ३०० पेक्षा जास्त खातेदार आणि ठेवीदारांनी खेमचंद मेहरकुरे यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिसात तक्रार नोंदविली. त्यावेळी मेहरकुरे स्वत: ठाण्यात हजर होऊन १ एप्रिलपासून सर्वांना ठेवी परत करणार असल्याचे आश्वासन ठेवीदारांना दिले होते. त्यानंतर ठेवीदाराच्या मोबाईलवर तुम्हाला पैसे देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. १ एप्रिलपूर्वीच ते मोबाईल बंद करून फरार झाले आहेत. तेव्हापासून ठेवीदार संतप्त असून त्याच्या पत्नीला जाब विचारात आहेत. ते कुठे गेले, हे माहीत नसल्याचे पत्नीचे उत्तर आहे. पोलीस खेमचंदला ताब्यात घेण्याची कोणतीही कारवाई करीत नाहीत, असा ठेवीदारांचा आरोप आहे.अध्यक्षांच्या जमिनी संचालकांनी घेतल्या ताब्यातअध्यक्षांनी खरेदी केलेल्या जमिनी सोसायटीच्या काही संचालकांनी ताब्यात घेऊन स्वत:च्या नावाने रजिस्ट्री केल्याची माहिती ठेवीदारांनी दिली. त्यामुळे खेमचंदकडे कुठल्या जमिनी शिल्ल्क नाहीत आणि आम्हाला पैसे मिळणार नाहीत, अशी भीती ठेवीदार आणि खातेदारांमध्ये आहे.सोसायटीचे ऑडिट सुरूजवळपास ४० कोटींच्या आर्थिक घोटाळ्यानंतर जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी पुढाकार घेत मागील तीन आर्थिक वर्ष आणि चालू वर्षाचे सोसायटीचे ऑडिट करण्याचे आदेश जिल्हा विशेष अंकेक्षक अनिल पाटील यांना दिले आहे. त्यानुसार पाटील यांनी चार अंकेक्षकाची नियुक्ती केली असून एक महिन्यात अहवाल येणार आहे. त्या आधारे सोसायटीच्या संचालक मंडळावर फौजदारी कारवाई करण्याचे संकेत आहेत. गेल्यावर्षी सोसायटीला एका सीए अंकेक्षकाने ‘अ’ ऑडिट वर्ग दिला होता, हे विशेष.

टॅग्स :agitationआंदोलनInvestmentगुंतवणूक