शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील सात गावांमध्ये डेंग्यूसदृश स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 12:13 IST

नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात सात गावांमध्ये डेंग्यूसदृश स्थिती आढळली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात सात गावांमध्ये डेंग्यूसदृश स्थिती आढळली आहे. गेल्या काही दिवसात व्हायरल इन्फेक्शन सोबतच डेंग्यूच्या रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. मात्र, आरोग्य विभागाकडून शहरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात अनेक ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहे. पावसाळ्यात डेंगीच्या डासांच्या उत्पत्तीसाठी पूरक वातावरण निर्माण होते. या डासांनी चावा घेतल्यास डेंग्यूची लागण होते. आरोग्य विभागाने केलेल्या घरांच्या सर्वेमध्ये जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील इसापूर, मौदा तालुक्यातील किरणापूर, नागपूर शहरांतर्गतच्या बक्षी ले-आऊट, नागपूर ग्रामीण तालुक्यातील सुरक्षानगर, हिंगणा तालुक्यातील साईनगर व कामठी तालुक्यातील यादवनगर या ठिकाणी अनेक घरांतील साचवून ठेवलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूसदृश अळ्या आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून निष्पन्न झाल्या. या गावातील घराचा हाऊस इंडेक्स हा १० पेक्षा अधिक असून, तेथे या डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. यासाठी विभागामार्फत नागरिकांना अबेटिंग नावाचे औषध देऊन प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच परिसरातील नागरिकांना साधारण तापही असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेण्याचा सूचनाही विभागाकडून करण्यात आल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :dengueडेंग्यू