शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
4
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
5
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
6
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
7
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
8
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
9
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
10
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
11
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
12
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
13
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
14
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
15
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
16
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
17
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
18
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
19
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
20
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बँक ऑफ इंडिया कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:31 IST

शुक्रवारी बँकेच्या किंग्जवे रोड येथील मुख्य कार्यालयासमोर संघटनेचे अध्यक्ष एस. रेवतकर आणि महासचिव सुरेश बोभाटे यांच्या नेतृत्वात ४०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाच्या धोरणाविरुद्ध निदर्शने केली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : व्यवस्थापनाच्या पक्षपाती धोरणाविरुद्ध बँक ऑफ इंडियाच्या संपूर्ण भारतातील कर्मचारी संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या अंतर्गत शुक्रवारी बँकेच्या किंग्जवे रोड येथील मुख्य कार्यालयासमोर संघटनेचे अध्यक्ष एस. रेवतकर आणि महासचिव सुरेश बोभाटे यांच्या नेतृत्वात ४०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाच्या धोरणाविरुद्ध निदर्शने केली.सुरेभ बोभाटे म्हणाले, व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या एका घटकाशी अत्यंत उदार आहे तर दुसऱ्या घटकाशी पक्षपाती आहेत. हा बँकेच्या शीर्ष व्यवस्थापनाच्या विवेकबुद्धीचा गैरवापर आहे. व्यर्थ खर्च, प्रशासनात सुधारणा, तातडीची भरती आणि बँकेतील अनैतिक प्रवृत्तीच्या मुद्यांमुळे संघटनेला आंदोलनाचा मार्ग निवडण्यास प्रवृत्त केले आहे. मागण्यांचा व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला असता कोणताही परिणाम झालेला नाही.याप्रसंगी बोभाटे यांनी व्यवस्थापनाच्या पक्षपाती मानसिकतेचे धोरण उघड केले. कायदेशीर व तांत्रिक औपचारिकता पारित करून प्रासंगिक कामगारांना नोकरी देण्याच्या बाबतीत बँक ऑफ इंडियामध्ये अवलंबलेल्या अनैतिक पद्धतींवर भाष्य केले. बँकेत भ्रष्टाचाराची शक्यता असून तरुणांचे शोषण होत आहे. बँकेत लिपीक आणि उप-कर्मचारी भरती करण्याची तातडीची गरज यावरही त्यांनी जोर दिला. पुढे १३ डिसेंबरला एक दिवस, जानेवारीत दोन दिवस संप करण्यात येणार असून मागण्यांचे निराकरण न झाल्यास आणि बँकेत अवलंबलेल्या अनैतिक पद्धतींमध्ये काहीच सुधारणा न झाल्यास अनिश्चितकालीन संप करण्याचा इशारा त्यांनी दिला. रेवतकर म्हणाले, बँक स्वत:ला अप्रत्यक्ष भ्रष्टाचारामध्ये सामील करून मोठ्या जोखमीत आणत आहे.निदर्शनेदरम्यान सुनील बेलखोडे, अशोक शेंडे, नारायण उमरेडकर, दिलीप चौधरी, हर्ष अग्रवाल, वृषाली शेंदरे, प्रांजली चित्रियो, लता ठाकूर, युगल सेलोकर, पूजा रंगारी, मोहम्मद इम्तियाज, श्रीकृष्ण चेंडके, योगेश समुंदरे, मनीषा बुराडे, राऊत, अभ्यंकर, मनोज बेलसरे, स्वरूपा धाबर्डे आणि अनेक कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :bankबँकEmployeeकर्मचारीagitationआंदोलन