शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

काळा फलक अन् सार्वजनिक जागांवर ‘ओपन थिएटर’साठी नाटूकले एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:40 AM

सोमवारी नागपुरातील विविध नाट्यसंस्थांच्या प्रमुखांनी महापौरांकडे नाट्य उपक्रमाविषयक जनजागृतीसाठी शहराच्या दहाही झोनमध्ये ‘काळा फलक’ उभारण्यासह, शहरातील सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर अथवा बागेमध्ये ‘ओपन थिएटर’ तयार करून देण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देनागपूरकर रंगकर्मी : महापौर आणि सांस्कृतिक संचालनालयालाकडे व्यक्त केली व्यथानिवेदनातून केला समस्यांचा जागर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाटुकले कधी एकत्र येतील, या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नव्हते. मात्र, केवळ घोषणेसाठी नव्हे तर कामासाठी एकत्रिकरण हवे, हे नागपूरकर रंगकर्मींनी सिद्ध केले आहे. सोमवारी नागपुरातील विविध नाट्यसंस्थांच्या प्रमुखांनी महापौरांकडे नाट्य उपक्रमाविषयक जनजागृतीसाठी शहराच्या दहाही झोनमध्ये ‘काळा फलक’ उभारण्यासह, शहरातील सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर अथवा बागेमध्ये ‘ओपन थिएटर’ तयार करून देण्याची मागणी केली आहे. या मागणीला महापौरांकडून तूर्तास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.शहरात हौशी रंगकर्मी मोठ्या प्रमाणात रंगकर्म करत असतात. मात्र, त्यांचे काम सुनियोजित नसल्याने, नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे, शहरातील नाट्यचळवळ म्हणावी तशी उभारी घेत नसल्याचे निदर्शनास येत असल्याने, रंगकर्मींनी शहराच्या प्रमुख वर्दळीच्या जागांवर दहा बाय ३० फुट आकाराचा ‘काळा फलक’ उभारण्याची मागणी यावेळी केली. या फलकावर शहरात होत असलेल्या नियमित नाट्य उपक्रमांची माहिती व नाट्यप्रयोगांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचल्यास, नागरिकांमधून नाट्यरसिक तयार होतील आणि चळवळीला गती मिळेल, असा विचार पटल्याने, महापौर नंदा जिचकार यांनी तात्काळ होकार कळविला आणि लागलीच संबंधित प्रशासनाला त्यावर काम करण्याच्या सूचनाही दिल्या. शिवाय, अनेक ठिकाणी बागांमध्ये ‘योगा शेड्स’ उभारण्यात आले आहेत. या शेड्सचा उपयोग दिवसातून केवळ एकच तास होतो आणि ऊर्वरित वेळेत, ती निरुपयोगी असते. त्यामुळे, योगा शेड्सच्या जागी ‘ओपन थिएटर्स’ उभारले गेले तर हे स्थळ सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास येतील. येथे योग साधनाही होईल आणि रंगकर्मीना तालमीसाठी व नाट्यसादरीकरणासाठी एक हक्काचे स्थळ मिळेल, असे रंगकर्मींनी सुचविले. त्यावर, महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद देण्यासोबतच, मनपा प्रशासन आणि समाजभवनामध्येही रंगकर्मींना तालमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविल्याने, रंगकर्मींनी यावेळी आनंद व्यक्त केला.यावेळी, महापौरांचे सहकारी सुनील अग्रवाल यांनीही रंगकर्मींच्या या अत्यंत अखर्चिक मागण्यांसाठी पुढकार घेण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी अंभ्रुणी सेवा संस्थेचे स्वप्नील बोहटे, राष्ट्रभाषा परिवारचे रुपेश पवार, बहुजन रंगभूमीचे वीरेंद्र गणवीर, हेमेंदू रंगभूमीचे जयंत बन्लावार, नटराज निकेतनचे गौरव खोंड, एकलव्य युवा संस्थेचे नितीन ठाकरे, विश्वोदयचे लक्ष्मीकांत वांदे, रूपाली वांदे, इतर नाट्य संस्थांचे निखिल टोंगळे, कौस्तुभ गाडगे, स्वप्निल बन्सोड उपस्थित होते. तत्पूर्वी रंगकर्मींचा हा मोर्चा सांस्कृतिक संचालनालयाच्या विभागीय कार्यालयाकडेही गेला होता.सायंटिफिकमधील त्रुटी दूर करासांस्कृतिक संचालनालयाच्या नागपूर विभागीय कार्यालयात रंगकर्मींनी संचालकांच्या नावे सहसंचालक अलका तेलंग यांच्याकडे ५९ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे स्थळ असलेल्या सायंटिफिक सभागृहातील त्रुटी दूर करण्यासाठीचे निवेदन दिले. तेलंग यांनी, यावर सकारात्मक प्रतिसाद देत तुमचे निवेदन संचालकांकडे पोहोचवून आणि सभागृह प्रशासनाला सांगून दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. रंगकर्मींच्या एकोप्यामुळे रंगकर्मींच्या समस्या आमच्या पर्यंत पोहोचल्या असून, त्या दृष्टीने कामेही सुरू झाले असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :NatakनाटकNanda Jichakarनंदा जिचकारMayorमहापौर