शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा क्रीडा साहित्य घोटाळ्यात १०९ जणांविरुद्ध आरोप निश्चित

By admin | Updated: August 25, 2016 02:18 IST

नागपूर महानगरपालिकेतील २००० ते २००२ मध्ये गाजलेल्या कोट्यवधीच्या ....

मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात चालणार खटला : १७ सप्टेंबरपासून सुनावणीनागपूर : नागपूर महानगरपालिकेतील २००० ते २००२ मध्ये गाजलेल्या कोट्यवधीच्या क्रीडा साहित्य घोटाळा प्रकरणी खटल्याच्या सुनावणीस मुख्य न्यायदंडाधिकारी डी. पी. रागीट यांच्या न्यायालयात १७ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून घोटाळ्यातील आरोपीविरुद्ध आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली. ही प्रकिया बुधवारी पूर्ण झाली. आतापर्यंत १०९ जणांविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले.या घोटाळ्यात भाजपचे काही तत्कालीन नगरसेवक आणि मनपा अधिकारी, अशा १२० जणांचा समावेश होता. त्यापैकी ७ आरोपी मरण पावले आहेत. या आरोपींपैकी दोघे विद्यमान आमदार आणि ३० जण सध्या नगरसेवक आहेत. आरोप निश्चित झालेल्यांमध्ये तत्कालीन क्रीडा अधिकारी साहेबराव राऊत, आशा बनारसी, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, माजी महापौर कल्पना पांडे, अर्चना डेहणकर, विक्रम पनकुले, रमेश सिंगारे, अनिल धावडे, मिलिंद गाणार, रज्जन चावरिया, बंडू पारवे, यशवंत मेश्राम, राजू बहादुरे, किशोर गजभिये, प्रमोद पेंडके यांचा समावेश आहे. २००० मध्ये क्रीडा साहित्य घोटाळ्याची तक्रार करण्यात आली होती. सप्टेंबर २००१ मध्ये राज्यातील काँग्रेस सरकारने मनपा बरखास्त केली होती. त्यावेळी टी. चंद्रशेखर यांना प्रशासक नेमण्यात आले होते. या घोटाळ्याची चौकशी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नंदलाल गुप्ता यांच्या समितीकडे सोपवण्यात आली होती. या समितीला अडीच कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा आढळून आला होता. त्यामुळे समितीच्या अहवालानुसार मनपा उपायुक्त रिझवान सिद्धीकी यांनी नोंदवलेल्या तक्रारीवरून १२० जणांविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात भादंविच्या ४२०, ४६८, ४७१ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घोटाळ्याचा तपास शहर गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. पी. चव्हाण हे या घोटाळ्याचे तपास अधिकारी आहेत. आज न्यायालयात आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे आणि बरेच आजी-माजी नगरसेवक आरोपी म्हणून उपस्थित होते. त्यांचे वकील अ‍ॅड. उदय डबले, अ‍ॅड. सुभाष घारे, अ‍ॅड. परिक्षित मोहिते, अ‍ॅड. लुबेश मेश्राम न्यायालयात उपस्थित होते. (प्रतिनिधी)