आर.आर. पाटील : पोलिसांच्या मुलांना नोकरीत पाच टक्के आरक्षण नरेश मानकर - पांढरकवडा शासनाच्या अन्य विभागांच्या तुलनेत राज्यातील पोलीस यंत्रणेला निश्चितच वेतन कमी आहे. पोलिसांच्या वेतनवाढी संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून पगारवाढीचा निर्णय लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सांगितले.पांढरकवडा येथे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन व पोलीस कर्मचारी वसाहतीच्या उद्घाटनाच्या निमित्त गुरुवारी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आले होते. यावेळी येथील शासकीय विश्राम भवनावर त्यांनी ‘लोकमत’शी खास बातचित केली. यावेळी ना. पाटील म्हणाले, पोलिसांच्या वेतनवाढीचा प्रश्न गृहखात्याने गांभीर्याने घेतला असून शक्य तेवढ्या लवकर त्यावर निर्णय घेतला जाईल. पोलिसांच्या मुलांना नोकरीत पाच टक्के आरक्षण दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गावपातळीवर महिला मंडळांकडून होत असलेल्या दारूबंदीच्या प्रयत्नाला पोलिसांकडून पाहिजे तसे समर्थन मिळत नसल्याचा मुद्दा पुढे येताच त्यांनी याची दखल घेण्याचे आदेश एसपींना दिले. ना. पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली. ही बाब आता जनतेच्या लक्षात येत आहे, असेही त्यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले.पोलिसांना माहीत नाही, असा एकतरी धंदा दाखवा गृहमंत्री आर.आर. पाटील म्हणाले, सर्व अवैध धंदे हे पोलिसांना माहीत असतातच, पोलिसांना माहीत नाही असा एकतरी अवैध धंदा आहे का ? पोलिसांनी मनावर घेतले तर ते सर्वच अवैध धंदे ते बंद करू शकतात. हे विधान करताना ना. पाटील यांनी कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्याकडे कटाक्ष टाकला.
वेतनवाढीचा निर्णय लवकरच
By admin | Updated: August 15, 2014 00:38 IST
शासनाच्या अन्य विभागांच्या तुलनेत राज्यातील पोलीस यंत्रणेला निश्चितच वेतन कमी आहे. पोलिसांच्या वेतनवाढी संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून पगारवाढीचा निर्णय
वेतनवाढीचा निर्णय लवकरच
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}