शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

कन्टेन्मेंट झोनमधील त्या रुग्णाचा मृत्यू प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे : काँग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 23:47 IST

मोमिनपुरा येथील हार्ट अटॅक आलेल्या वृद्ध रुग्णाचा मृत्यू हा केवळ प्रशासनाचे दुर्लक्ष व आडमुठेपणामुळेच झाल्याचा आरोप करीत काँग्रेस ने शुक्रवारी विभागीय आयुक्तांच्या कक्षात ठाण मांडले. सोबतच नगरसेवक नितीन साठवणे यांच्या विरोधातील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणीही लावून धरली.

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांच्या कक्षात मांडले ठाण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोमिनपुरा येथील हार्ट अटॅक आलेल्या वृद्ध रुग्णाचा मृत्यू हा केवळ प्रशासनाचे दुर्लक्ष व आडमुठेपणामुळेच झाल्याचा आरोप करीत काँग्रेस ने शुक्रवारी विभागीय आयुक्तांच्या कक्षात ठाण मांडले. सोबतच नगरसेवक नितीन साठवणे यांच्या विरोधातील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणीही लावून धरली.काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी दुपारी विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांचा कक्ष गाठत ठाण मांडले. यावेळी आ. ठाकरे म्हणाले, मोमीनपुऱ्यातील संबंधित रुग्णाला प्रतिबंधित क्षेत्र असल्याने वेळेवर उपचार मिळाले नाहीत. तसेच डॉक्टरही या भागात उपचारासाठी आले नाही. शासनाच्या निर्देशानुसार प्रतिबंधित क्षेत्रात ‘मोबाईल डॉक्टर व्हॅन’असणे गरजेचे आहे. परंतु नागपूर शहरात प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांसाठी अशी सुविधा कोठेही उपलब्ध नाही. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहराला वेठीस धरले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.शहरातील कोणत्याही भागात प्रतिबंधित किवा विलगीकरणाची कारवाई करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, कोरोनासंबंधी परिस्थिती कशी नियंत्रणात येईल याविषयी शहरातील आमदार, मंत्री यांनाही विचारून कारवाई करावी, चौथ्या लॉकडाऊननंतर शासनाने जी अंशत: शिथिलता दिली आहे त्यामुळे इतर शहरांमधून नागरिक जे नागपूर शहरात चारचाकी किवा खासगी वाहनांनी परत येत आहेत, त्या सर्व नागरिकांची नोंद विमानतळ व रेल्वे स्टेशनवरील नोंदीसारख्याच कराव्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.शिष्टमंडळात अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, नगरसेवक संजय महाकाळकर, संदीप सहारे, पुरुषोत्तम हजारे, मनोज सांगोळे, मनोज गावंडे, नितीन पुणेकर, हरीश ग्वालबंशी, नितीश ग्वालबंशी, रश्मी उईके, दर्शनी धवड, साक्षी राऊत, उज्ज्वला बनकर, लोणारे आदींचा समावेश होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसagitationआंदोलन