शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तलावात बुडून गुराखी मुलाचा मृत्यू

By admin | Updated: May 13, 2016 03:24 IST

मालगुजारी तलावात शिरलेल्या जनावरांना बाहेर काढण्यासाठी तलावात उतरलेल्या १२ वर्षीय गुराखी मुलाचा बुडून मृत्यू झाला.

धानला येथील घटना : मृतदेहाचा शोध सुरू, मासेमाऱ्यांची मदततारसा : मालगुजारी तलावात शिरलेल्या जनावरांना बाहेर काढण्यासाठी तलावात उतरलेल्या १२ वर्षीय गुराखी मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मौदा तालुक्यातील धानला येथे गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. वृत्त लिहिस्तोवर त्याचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकातील सदस्यांना यश आले नव्हते. जितेंद्र अनिल साकोरे (१२, रा. धानला, ता. मौदा) असे मृत मुलाचे नाव आहे. जितेंद्र व मनीष चंद्रशेखर मुंदेकर (९, रा. धानला, ता. मौदा) दोघेही गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेले होते. दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांनी आपापली गुरे पाणी पाजण्यासाठी गावालगत असलेल्या मालगुजारी तलावाजवळ आणली. त्यातच तलावात शिरलेल्या म्हशी प्रयत्न करूनही तलावाबाहेर येत नव्हत्या. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी जितेंद्र तलावात उतरला. म्हशींना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तो तलावातील गाळात फसला. बराच वेळ होऊनही जितेंद्र तलावाबाहेर येत नसल्याचे किंबहुने; तो दिसत नसल्याने मनीषने लगेच गाव गाठले आणि सदर प्रकाराची माहिती आईवडिलांसह नागरिकांना दिली. पाहतापाहता तलावाजवळ नागरिकांची गर्दी झाली. माहिती मिळताच मौदा पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जितेंद्रचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने नागपूरहून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. परंतु, जितेंद्रचा थांगपत्ता लागला नाही. धानला येथील हा तलाव प्राचीन असून, त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने या तलावातील गाळ काढण्यासाठी प्रयत्न चालविले. परंतु, त्याला स्थानिक मच्छिमार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला. या तलावाच्या मध्यभागी मोठा खड्डा असून, त्यात गाळ साचला आहे. जितेंद्र हा त्या खड्ड्यात फसला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)