भाजलेल्या महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:07 IST2021-04-16T04:07:28+5:302021-04-16T04:07:28+5:30

३ एप्रिलला सकाळी ९.३० वाजता सुनीता त्यांच्या घरी स्वयंपाक करीत असताना त्यांच्या साडीच्या पदराला आग लागल्याने त्या भाजल्या. त्यांना ...

Death of a burnt woman | भाजलेल्या महिलेचा मृत्यू

भाजलेल्या महिलेचा मृत्यू

३ एप्रिलला सकाळी ९.३० वाजता सुनीता त्यांच्या घरी स्वयंपाक करीत असताना त्यांच्या साडीच्या पदराला आग लागल्याने त्या भाजल्या. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना १४ एप्रिलच्या रात्री ७ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या सूचनेवरून वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---

शिक्षकाची विष पिऊन आत्महत्या

नागपूर - जगण्यात स्वारस्य वाटत नाही. मला माफ करा, अशी चिठ्ठी लिहून ठेवत एका शिक्षकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. महेंद्र मुधकर वैरागडे (वय ४८) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

वाठोड्यातील ऑरेंजनगरात राहणारे महेंद्र वैरागडे आणि त्यांची पत्नी अश्विनी (वय ३९) हे दोघेही शिक्षक आहेत. त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे. घरची स्थिती चांगली आहे. असे असताना अनामिक कारणामुळे वैरागडे यांना नैराश्याने घेरले होते. त्यातून त्यांनी बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास विष पिऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली. त्यात त्यांनी घरच्यांची माफी मागितली. जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे वैरागडे यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. अश्विनी यांच्या तक्रारीवरून वाठोड्याचे पीएसआय मुंडे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---

Web Title: Death of a burnt woman