शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

सख्ख्या भावाचा खून करणाऱ्याला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 23:12 IST

सत्र न्यायालयाने सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व अन्य विविध प्रकारची शिक्षा सुनावली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही घटना गिट्टीखदान पोलिसांच्या हद्दीतील आहे.

ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय : मोटरसायकलवरून झाला होता वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व अन्य विविध प्रकारची शिक्षा सुनावली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही घटना गिट्टीखदान पोलिसांच्या हद्दीतील आहे.
रोशन छन्नूलाल लिल्हारे (२४) असे आरोपीचे नाव असून तो स्वामीनगर येथील रहिवासी आहे. त्याला भादंविच्या कलम ३०२ (खून) अंतर्गत जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास तर, कलम २०१ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत २ वर्षे कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मयताचे नाव मुनीश (२६) होते. ९ जून २०१५ रोजी आरोपीने मुनीशला मोटरसायकल मागितली. मुनीशने त्याला मोटरसायकल देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांचे भांडण झाले. दरम्यान, आरोपीने मुनीशच्या डोक्यावर लाकडी बल्लीने जोरदार वार केला. त्यामुळे मुनीश गंभीर जखमी होऊन जाग्यावरच ठार झाला. त्यानंतर आरोपीने पुरावे नष्ट केले.
पोलीस तक्रारीनंतर आरोपीला १० जून रोजी गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अनंत भंडे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. ज्योती वजानी व अ‍ॅड. राजेंद्र मेंढे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर