शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दत्तात्रेय होसबळे रा.स्व. संघाचे नवे सरकार्यवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 13:10 IST

Nagpur News रा.स्व. संघाच्या अ.भा. प्रतिनिधी सभेने दत्तात्रय होसबाळे यांची नवे सरकार्यवाह म्हणून निवड केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबळे यांची निवड करण्यात आली आहे. २००९ पासून ते संघाचे सहसरकार्यवाह म्हणून जबाबदारी पार पाडत होते. संघाच्या बंगळुरू येथील अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत त्यांची निवड झाली. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व मावळते सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत होसबळे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला व एकमताने त्यांची निवड झाली.६६ वर्षीय होसबळे हे कर्नाटक मधील शिमोगा जिल्ह्यातील सोराबा येथील आहेत. इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले होसबळे हे लहानपणीच संघाची जुळले होते. १९७२ सालापासून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य म्हणून काम केले. आणीबाणीत त्यांनी कार्य केले होते व मिसाअंतर्गत ते तुरुंगातदेखील होते. १९७८ साली ते विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्य सुरू केले. नागपूर नगर संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली व त्यानंतर विद्यार्थी परिषदेत अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. परिषदेचे राष्ट्रीय संघटनमंत्री म्हणूनदेखील त्यांनी कार्य केले. देशात अनेक ठिकाणी अभाविपच्या कार्यविस्तारात त्यांनी मौलिक भूमिका पार पाडली. २००४ मध्ये त्यांना संघाचे अखिल भारतीय सहबौद्धिक प्रमुख बनविण्यात आले. २००९ मध्ये ते संघाचे सहसरकार्यवाह बनले. त्यानंतर संघाच्या विस्तारात त्यांची मोठी भूमिका राहिली. २०१४ च्या निवडणूकांच्या अगोदर नरेंद्र मोदी यांना भाजपचा चेहरा म्हणून समोर आणण्यासाठी होसबळे आग्रही होते.

आपत्कालिन परिस्थितीत सांभाळला मोर्चादत्तात्रेय होसबळे यांनी अनेक  आपत्कालिन स्थितीत संघाच्या सेवाकार्यांचे नियोजन केले. २०१५ साली नेपाळमध्ये आलेल्या भीषण भूकंपादरम्यान संघातर्फे मदतकार्य सुरू करण्यात आले होते. त्यावेळी नेपाळमध्ये प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन होसबळे यांनी मोर्चा सांभाळला होता.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ