शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चाकूच्या धाकावर बालिकेसोबत विकृत चाळे, आरोपीचा जामीन फेटाळला

By admin | Updated: November 12, 2016 02:54 IST

चाकूच्या धाकावर एका बालिकेसोबत विकृत चाळे केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश

नागपूर : चाकूच्या धाकावर एका बालिकेसोबत विकृत चाळे केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. दास यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. शैलेश भोजराज यादव, असे आरोपीचे नाव असून तो प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नीरी कॉलनी येथील रहिवासी आहे. पीडित बालिका आपल्या घराच्या दारात खेळत असताना आरोपीने तिचा विनयभंग करून बलात्काराच्या हेतूने चाकूचा धाक दाखवून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी राणाप्रतापनगर पोलिसांनी भादंविच्या ३५४ ए, ३५४ बी, ५०६ (२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याच्या कलम ७ आणि ८ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. आरोपीने न्यायालयात जामीन अर्ज दाखल करताच सरकार पक्षाच्या वतीने जोरदार विरोध करण्यात आला. आरोपी हा लैंगिक गुन्ह्याच्या सवयीचा असून तो समाजासाठी घातक आहे. त्याने अशाच प्रकारचे गुन्हे सीताबर्डी आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले आहेत. तो लैंगिकरीत्या विक्षिप्त आहे. त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा. न्यायालयाने सरकार पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील माधुरी मोटघरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)