शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
3
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

नृत्याची धम्माल..वैशालीच्या गीतांची कमाल अन् प्राचीचा संवाद

By admin | Updated: December 1, 2014 00:52 IST

‘ऐका दाजीबा’ फेम प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या सुरेल गीतांनी प्रेक्षकांनी अख्खे स्टेडियम डोक्यावर घेतले. त्यात प्रसिद्ध अभिनेत्री प्राची देसाई हिची उपस्थिती अन् लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड

लोकमत सखी मंचच्या आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी
नागपूर : ‘ऐका दाजीबा’ फेम प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या सुरेल गीतांनी प्रेक्षकांनी अख्खे स्टेडियम डोक्यावर घेतले. त्यात प्रसिद्ध अभिनेत्री प्राची देसाई हिची उपस्थिती अन् लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरराज्यीय धमाल दांडिया’ स्पर्धेची अंतिम फेरी, अशा रंगारंग कार्यक्रमाची मेजवानी नागपूरकरांना शनिवारी मिळाली. खच्चून भरलेल्या चिटणीस पार्क मैदानावरील १० हजाराहून अधिक प्रेक्षक तब्बल चार तास वैशाली सामंतच्या गाण्यावर व धमाल दांडियाच्या तालावार थिरकले. स्पर्धेचे परीक्षक असलेले स्टार प्रवाहवरील जयोस्तुते मालिकेचे निर्माता महेश कोठारे, अभिनेत्री सुरेखा कुडची, श्वेता शिंदे व जुई गडकरी यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा, मातोश्री वीणादेवी दर्डा व लोकमत सखी मंचच्या अध्यक्षा दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते मालार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्र्रमाची सुरुवात झाली.
याप्रसंगी लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन, खासदार विजय दर्डा, अभिनेत्री प्राची देसाई, गायिका वैशाली सामंत, कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत बोदड, आरती बोदड, निर्माता महेश कोठारे, अभिनेत्री सुरेखा कुडची, श्वेता शिंदे व जुई गडकरी, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधाकर कोहळे, महापालिका आयुक्त श्याम वर्धने, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक प्रकाश जाधव, रायसोनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशनचे उपाध्यक्ष हेमंत सोनारे, युनिक स्लीम पॉर्इंट अ‍ॅण्ड ब्युटी क्लिनिकच्या संचालिका डॉ. रिचा जैन आदी उपस्थित होत्या.
उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत लोकमत नागपूर युनिटचे महाव्यवस्थापक नीलेश सिंह यांनी केले.
कार्यक्रमाला लोकमत समूहाचे संचालक (परिचालन) अशोक जैन, उद्योगपती दिलीप छाजेड, जैन सहेली मंडळाच्या अध्यक्षा माधुरी बोरा, कोषाध्यक्ष अनुजा छाजेड आदी उपस्थित होत्या.
संचालन नेहा जोशी यांनी केले. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक रायसोनी ग्रुप आॅफ एज्युकेशन तर पारितोषिक प्रायोजक ‘युनिक स्लीम पॉर्इंट अ‍ॅण्ड ब्युटी क्लिनिक’ हे होते. (प्रतिनिधी)