शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
3
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
4
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
5
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
6
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
7
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
8
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
9
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
10
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
11
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
12
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
13
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
14
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
15
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
16
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
17
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
18
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
19
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
20
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
Daily Top 2Weekly Top 5

डीएमईआरच्या दिरंगाईचा मेडिकलला फटका

By admin | Updated: May 16, 2014 00:43 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) पुन्हा एकदा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर) दिरंगाईचा फटका बसला आहे.

अर्धा उन्हाळा उलटूनही कूलरची प्रतीक्षा

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) पुन्हा एकदा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर) दिरंगाईचा फटका बसला आहे. मार्चमध्ये पाठविण्यात आलेल्या १00 कूलर्सच्या प्रस्तावाला डीएमईआरने आता मंजुरी दिली आहे. अर्धा उन्हाळा संपल्यावर पुढील आठवड्यात हे कूलर्स लागणार आहेत.

दरवर्षी उशिरा लागणारे कूलर्स आणि रुग्णांना होणारा त्रास पाहता मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे यांनी तप्त उन्हाळ्यात मेडिकलला ‘कुल’ ठेवण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासूनच तयारी सुरू केली होती. विविध वॉर्ड आणि विभागांकडून कूलर्स संदर्भातील प्रस्ताव मागविण्यात आले होते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, साधारण २00 वर कूलर्सची मागणी केली होती. त्याला निम्मे करून विविध आकाराच्या १00 कूलर्सचा प्रस्ताव अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्याकडे पाठविण्यात आला. परंतु याची किंमत तीन लाखांपर्यंत जात असल्याने, हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याकडे पाठविण्यात आला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावाला डीएमईआरने मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात मंजुरी दिली.

तब्बल दीड महिना रुग्णांसह डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांना उकाड्यात काढावा लागला. कूलर्सच्या पुरवठय़ाची जबाबदारी साई ऑटोमेशन या कंपनीला देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात सर्वच कूलर्स मेडिकलमध्ये लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यापासून केलेल्या तयारीला डीएमईआरच्या दिरंगाईमुळे चांगलाच फटका बसला आहे. (प्रतिनिधी)