शहरं
Join us  
Trending Stories
1
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
2
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
3
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
4
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
5
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
6
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
7
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
8
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
9
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
10
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
11
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
12
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
13
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
14
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
15
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
16
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
17
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
18
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
19
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
20
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेती पक्षपाताच्या चक्रव्यूहात

By admin | Updated: November 20, 2014 01:01 IST

विदर्भातील शेती शासकीय पक्षपाताच्या चक्रव्यूहात अडकली आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील अनुशेष सतत वाढत आहे. कृषी सवलत, निधी पुरवठा, कृषिपंपांना वीज जोडणी इत्यादीबाबत विदर्भावर अन्याय करण्यात येत आहे,

हायकोर्टाची दखल : स्वत:हून दाखल केली जनहित याचिकानागपूर : विदर्भातील शेती शासकीय पक्षपाताच्या चक्रव्यूहात अडकली आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील अनुशेष सतत वाढत आहे. कृषी सवलत, निधी पुरवठा, कृषिपंपांना वीज जोडणी इत्यादीबाबत विदर्भावर अन्याय करण्यात येत आहे, असा आरोप अनुशेषाचे अभ्यासक माजी मंत्री अ‍ॅड. मधुकर किंमतकर यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणाची दखल घेऊन स्वत:हून जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी आज, बुधवारी प्रकरण हाताळण्यासाठी वरिष्ठ वकील सी.एस. कप्तान यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती केली.विदर्भातील अनुशेष सतत वाढत आहे. विदर्भात ६५ टक्के वीजनिर्मिती होत असली तरी येथील शेतीला मात्र केवळ १४ टक्के वीज मिळते. नागपूर विभागात १०.९०, तर अमरावती विभागात १७.३७ टक्के क्षेत्रालाच वीज पुरवठा होतो. पुणेमध्ये २०.२८, तर नाशिकमध्ये २०.२८ टक्के क्षेत्रात वीज पुरवठा आहे. हजार हेक्टर कृषीक्षेत्रामागे वीज वापरण्याचे प्रमाण पाहिल्यास पुणे (१८२४.६५ युनिट्स) आघाडीवर आहे. यानंतर नाशिक (१७८७.९८ युनिट्स) व मराठवाड्याचा (१०८९.१८ युनिट्स) क्रमांक लागतो. अमरावती विभागात ७००, तर नागपूर विभागात ४९९.२० युनिट्चा वापर आहे. विदर्भात आजच्या घडीला ६ लाख ९० हजार ५३१ कृषिपंपांचा अनुशेष आहे. कृषिपंप जोडणीचे अर्ज पैसे भरूनही प्रलंबित ठेवण्यात येतात. मार्च २०१४ पर्यंत एकूण ६५ हजार ६४८ अर्ज प्रलंबित होते. यापैकी ५५ हजार ४४३ अर्जदारांना पैसे भरूनही जोडणी दिली गेली नाही. २०१३-१४ मध्ये केवळ २५ हजार ८५९ कृषिपंपाना जोडणी देण्यात आली. यावर्षी १ एप्रिलपर्यंत १९ हजार अर्ज आले. यातील १५ हजार ११ शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत. परंतु त्यांना वीज जोडणी मिळाली नाही, असे अ‍ॅड. किंमतकर यांचे म्हणणे आहे. शासनातर्फे अ‍ॅड. नहुष खुबाळकर यांनी कामकाज पाहिले.कालव्यांची दुरुस्ती नाहीकालवे दुरुस्त केले जात नसल्यामुळे शेकडो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणाऱ्या पाणीपट्टीतून कालव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याचे नियोजन असते. ही वसुली केल्यानंतरही दुरुस्ती करण्यात येत नाही. परिणामी विदर्भातील जवळपास एक तृतीयांश पाण्याचा वापर करण्यासाठी प्रकल्पांचे नियोजनच होत नाही.(प्रतिनिधी)