शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅक स्पॉट बनलेला सदर उड्डाणपूलाचा कट बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:08 IST

प्रभाव लोकमतचा नागपूर : ब्लॅक स्पॉट बनलेला सदर उड्डाण पुलाच्या कटची समस्या गांभीर्याने घेत खासदार रस्ते सुरक्षा समितीने या ...

प्रभाव लोकमतचा

नागपूर : ब्लॅक स्पॉट बनलेला सदर उड्डाण पुलाच्या कटची समस्या गांभीर्याने घेत खासदार रस्ते सुरक्षा समितीने या भागाचे निरीक्षण केले. समितीने सदर उड्डाण पुलाच्या मॉयलच्या गेटजवळील कट बंद करण्याची शिफारस केली आहे.

जुना काटोल नाका चौकापासून सदर उड्डाण पुलावर जाताना मॉयल गेट हाऊस गेटसमोरील कटमुळे अपघाताच्या वाढत्या शक्यतेवर लोकमतने २६ डिसेंबरला ‘ब्लॅक स्पॉट बनला सदर उड्डाण पुलाचा कट’ या शिर्षकाखाली बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर संबंधित विभागासह खासदार सदस्य रस्ते सुरक्षा समितीने ही बाब गांभीर्याने घेतली. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही समस्या सोडविण्यासाठी योग्य पाऊले उचलण्याचे निर्देश संबंधितांना दिले होते. याच शृंखलेत शनिवारी रस्ते सुरक्षा समितीचे सदस्य चंद्रशेखर मोहिते यांच्यासह वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागाचे निरीक्षण करून समस्या समजावून घेतल्या.

समितीने मॉयल गेस्ट हाऊस गेटसमोरील कट बंद करण्यासह झाडे स्थानांतरित करण्याची आणि ‘वाहने हळू चालवा’ बोर्ड लावण्याची शिफारस केली आहे. या प्रसंगी पोलीस उपायुक्तांचे (वाहतूक) रीडर पोलीस निरीक्षक दीपक गोसावी, अपघात सेलचे हवालदार मंगेश देशमुख, शिपाई हरीश बावणे, सक्करदरा झोनच्या वाहतूक शाखेचे शिपाई कार्तिक मडगुलवार उपस्थित होते.

चंद्रशेखर मोहिते यांनी मनपाचे वाहतूक अभियंता शकील नियाजी यांना पत्र लिहून जुना काटोल नाका चौकातून सदर उड्डाण पुलावर जाताना मॉयल गेस्ट हाऊस गेटसमोरील कट त्वरित बंद करण्याची शिफारस केली आहे. तसेच गेटसमोरील सर्व्हिस रोडदरम्यानची दोन झाडे वाहतुकीसाठी अपघाताचे स्थळ असल्याने स्थानांतरित करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.

याशिवाय समितीने सक्करदरा वाहतूक परिमंडळांतर्गत येणाऱ्या ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण केले. यामध्ये शीतला माता चौक, दिघोरी चौक, चामट चक्की चौक, दिघोरी टेलिफोन चौक, खरबी चौक, वाठोडा चौक, कबाडी शॉपसमोरील ब्लॅक स्पॉटचा समावेश आहे. निरीक्षणानंतर संबंधित ब्लॅक स्पॉटवर कोणते उपाय करता येतील, याचा अहवाल वाहतूक विभागाला सोपविला आहे.