आरोग्य तपासणी शिबिराची उत्सुकता

By Admin | Updated: June 17, 2016 03:23 IST2016-06-17T03:23:57+5:302016-06-17T03:23:57+5:30

लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजन

Curiosity for Health Check-up Camp | आरोग्य तपासणी शिबिराची उत्सुकता

आरोग्य तपासणी शिबिराची उत्सुकता

लोकमत व जैन सहेली मंडळाचे आयोजन : डॉ. दंदे फाऊंडेशनचे सहकार्य
नागपूर : लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवार १८ जून रोजी महिला आणि मुलांसाठी बुटीबोरी स्थित श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेन्ट अँड वेलफेयर सेंटर येथे नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत आणि जैन सहेली मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आणि डॉ. दंदे फाऊंडेशनच्या सहाकार्याने आयोजित या शिबिराचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक आयोजकांशी संपर्क साधत आहेत.

सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित या शिबिरात प्रामुख्याने नेत्र रोग, अस्थि रोग, जनरल सर्जरी, मेंदू रोग, मूत्राशयाशी संबंधित रोग, प्लास्टीक सर्जरी, कर्करोग, नाक, कान, गळा, स्त्री रोग, स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग, जनरल मेडिसिन, त्वचा आणि गुप्त रोग, मनोविकार, श्वसन, क्षय रोग, ग्रंथी विकार आदी रोगांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय सर्व रुग्णांचे हिमोग्लोबिन, ब्लड प्रेशर, ईसीजी, ईईजी, बीएमवाई, पीएफटी, पॅप स्मीयर आदींची तपासणीही नि:शुल्क करण्यात येणार आहे. स्थानिक महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिरात नोंदणी आणि अधिक माहितीसाठी लोकमत भवन, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, रामदासपेठ येथे प्रत्यक्ष किंवा दूरध्वनी क्रमांक २४२९३५५, ९९२२९१५०३५, ९८८१७४९३९० आणि ९८२२४०६५६२ या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)

Web Title: Curiosity for Health Check-up Camp