शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

नागपुरात क्रूरतेचा कळस, कुत्र्याच्या पिलाला जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 14:10 IST

Nagpur News : नागपूर शहरातील पांढरपेशांची वस्ती अशी ओळख असलेल्या प्रतापनगरात कुत्र्याच्या एका निष्पाप पिलाला जिवंत जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

नागपूर : शहरातील पांढरपेशांची वस्ती अशी ओळख असलेल्या प्रतापनगरात कुत्र्याच्या एका निष्पाप पिलाला जिवंत जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सैतानालादेखील मान खाली घालायला लावणाऱ्या या प्रकाराची पोलिस तक्रार देण्यात आली असून प्राणिप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.‘सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशन’च्या संस्थापिका स्मिता मिरे या गुरुवारी सकाळी त्यांच्या श्वानाला फिरविण्यासाठी घेऊन गेल्या असताना गणेश कॉलनीतील मैदानाजवळ त्यांना काहीतरी जाळल्याचे दिसून आले. जवळ जाऊन पाहिले असता दीड ते दोन महिन्याचे कुत्र्याचे पिल्लू होते. त्यांनी जवळपास विचारणा केली असता हा प्रकार कधी झाला व कुणी केला याबाबत कुणालाही काहीच कल्पना नव्हती. मिरे यांनी त्यानंतर थेट राणाप्रतापनगर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंविच्या कलम २८९, कलम ४२८ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलम ११(१) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.१५ दिवसांतील सहावी घटनामागील १५ दिवसांत कुत्र्यांना क्रूरतेने मारल्याची ही सहावी घटना आहे. एका कुत्र्याला विष देऊन मारण्यात आले व अज्ञातांनी गणेश कॉलनीतच त्याचे शव आणून टाकले होते. तर इंदोरा येथे एका पिलाच्या पाठीवर पेव्हर ब्लॉकने प्रहार करून त्याला ठार करण्यात आले. गणेश कॉलनीत याअगोदर जवळपासच्या भागातील काही लोकांनी पोत्यात भरून कुत्र्याची पिल्ले फेकली होती.

टॅग्स :dogकुत्रा