शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीची वसुली पण विकासाचे तीनतेरा

By admin | Updated: November 10, 2015 03:25 IST

कोणत्याही शहराचा विकास हा प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जातो. परंतु नागपूर देशातील एकमेव असे शहर आहे...

नासुप्र : ५७२-१९०० ले-आऊ टमध्ये नागरी सुविधांचा अभावनागपूर : कोणत्याही शहराचा विकास हा प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जातो. परंतु नागपूर देशातील एकमेव असे शहर आहे की या शहरात महापालिका व नागपूर सुधार प्रन्यास अशा दोन संस्थांवर शहर विकासाची जबाबदारी आहे. शहरातील नागरिकांना रस्ते, पाणीपुरवठा, गडरलाईन, पथदिवे अशा स्वरूपाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी या दोन संस्थांवर आहे. दोन संस्था असल्याने नागपूर शहराचा झपाट्याने विकास होण्याची अपेक्षा होती. परंतु शहराचा सर्वांगीण विकास झालेला नाही. ५७२-१९०० यासारख्या अविकसित ले-आऊ टमधील नागरिकांकडून विकास शुल्काच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल करण्यात आले. परंतु या भागाचा अद्याप विकास झालेला नाही. शहराचा मोठा भाग ५७२-१९०० ले-आऊ टमध्ये येतो. परंतु यातील बहुसंख्य भागात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या भागातील नागरिकांनी नासुप्रकडे १६ रुपये प्रति चौरस फूट याप्रमाणे विकास शुल्क जमा केले आहे. विकास शुल्काच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल करण्यात आले. आता हा दर ५५ रुपये प्रति चौरस फूट करण्यात आला आहे. गुंठेवारी कायद्यांतर्गत मोठ्या प्रमाणात प्लॉट नियमित करण्यात आले आहे. परंतु त्यातुलनेत विकास कामे होताना दिसत नाही. महापालिकेच्या ७२ प्रभागात १४५ वॉर्ड आहेत. शहरालगतचे अनेक वॉर्ड नासुप्रअंतर्गत येतात. परंतु येथून निवडून आलेले नगरसेवक महापालिकेत त्यांचे प्रतिनिधित्व करतात. नासुप्रच्या ले-आऊ टमध्ये महापालिका विकास कामे करू शकत नाही. त्यामुळे त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. खासदार वा आमदार निधीतूनच या भागात विकास कामे केली जातात. परंतु हा निधी पुरेसा नसतो. (प्रतिनिधी)