क्रिकेट सट्टा अड्ड्यावर गुन्हे शाखेची धाड ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:08 IST2021-01-04T04:08:59+5:302021-01-04T04:08:59+5:30

आरोपीस अटक : ९६ हजाराचा मुद्देमाल जप्त नागपूर : ऑस्ट्रेलिया बिगकॅश लीग २०-२० क्रिकेट टुर्नामेंटमधील मॅचवर खायवाडी करीत असलेल्या ...

Crime Branch raids cricket betting den () | क्रिकेट सट्टा अड्ड्यावर गुन्हे शाखेची धाड ()

क्रिकेट सट्टा अड्ड्यावर गुन्हे शाखेची धाड ()

आरोपीस अटक : ९६ हजाराचा मुद्देमाल जप्त

नागपूर : ऑस्ट्रेलिया बिगकॅश लीग २०-२० क्रिकेट टुर्नामेंटमधील मॅचवर खायवाडी करीत असलेल्या आरोपीस गुन्हे शाखेने रंगेहात अटक करून त्याच्याकडून ९६ हजार ११० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घर नं. ३९९, श्रद्धा अपार्टमेंट फ्लॅट नं. २०१, संत्रा मार्केट बजेरिया येथे गुन्हे शाखेने धाड टाकली. यात आरोपी राहुल रमेशचंद्र अग्रवाल (४५) हा आरोपी क्रिष्णा अग्रवाल रा. इंदूर याच्याकडून आयडी मिळवून ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या बिगकॅश लीग २०-२० क्रिकेट टुर्नामेंटमध्ये ॲडिलेड विरुद्ध सिडनी सिक्सर संघात सुरू असलेल्या मॅचवर खायवाडी करताना आढळला. त्याच्या ताब्यातून क्रिकेट जुगाराचे साहित्य व रोख असे एकूण ९६ हजार ११० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांच्या निर्देशानुसार पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक पंकज धाडगे, पवन मोरे, प्रशांत लांडे, दशरथ मिश्रा, अनिल दुबे, श्याम कडू, संदीप मावलकर, विशाल रोकडे यांनी केली.

..............

Web Title: Crime Branch raids cricket betting den ()