शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

नव्याने डीपीआर तयार करा

By admin | Updated: May 1, 2016 02:54 IST

कुंवारा भिवसन हे पारशिवनी तालुक्यातील आदिवासी समाजाचे धार्मिक स्थळ असून, या स्थळाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी नव्याने डीपीआर...

‘कुंवारा भिवसन’ धार्मिकस्थळ : पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देशनागपूर : कुंवारा भिवसन हे पारशिवनी तालुक्यातील आदिवासी समाजाचे धार्मिक स्थळ असून, या स्थळाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी नव्याने डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पर्यटन विभागाला दिले.तत्कालीन आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांना या भागाचा विकास आराखडा दिला होता. सप्टेंबर २०१४ मध्ये अडीच कोटींचा निधी या भागाच्या विकासासाठी शासनाने दिला, तो अजूनही खर्च झाला नाही. आता नव्याने डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.दरम्यान, कुंवारा भिवसन येथील मंदिर कमिटीला ही जागा त्यांना आपल्या ताब्यात हवी आहे. ही संपूर्ण जागा वन विभागाची असून, वन विभागाने ही जागा कमिटीला दिल्यानंतरच या जागेवर काम करता येईल किंवा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी नासुप्रने आणि वन विभागाने आराखडा तयार करावा व काम नासुप्र करेल. त्यानंतर या जागेची संपूर्ण देखभाल नासुप्र करेल. पण हा प्रस्ताव संस्थानच्या पदाधिकाऱ्यांना मान्य नव्हता. त्यामुळे आधी वन विभागाकडून जागा मिळवा त्यानंतर डीपीआरची अंमलबजावणी करणे शक्य होईल, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी बैठकीत सांगितले. दुसऱ्या बाजूने शासनाने दिलेल्या या निधीची कामे सुरू करण्याचा आग्रहही केला जात होता.कुंवारा भिवसन हा परिसर मेट्रोरिजनमध्ये असल्यामुळे या परिसराचा विकास नासुप्रच करू शकते. या कामासाठी आदिवासी विकास विभाग निधी देऊ शकतो. सुमारे १५ लाखांवर भाविक दरवर्षी या स्थळाला भेट देतात. त्यामुळे या ठिकाणी मूलभूत सुविधा आवश्यक आहे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीनेही या भागाचा विकास करण्याची संधी आहे. वन विभागाची जागा मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो वन विभागाला द्यावा, त्यानंतर डीपीआरवर निर्णय घेऊ, असेही पालकमंत्री म्हणाले.या बैठकीला आमदार मल्लिकार्जुन रेड्डी व माजी आमदार अ‍ॅड. आशिष जयस्वाल व आदिवासी समाजाचे नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)