मनपा केंद्रांमध्ये कोविशिल्ड उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:11 IST2021-08-24T04:11:54+5:302021-08-24T04:11:54+5:30

नागपूर : राज्य सरकारकडून कोविशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे मंगळवारी (दि. २४) १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण महापालिकेसह ...

Covishield available at Municipal Centers | मनपा केंद्रांमध्ये कोविशिल्ड उपलब्ध

मनपा केंद्रांमध्ये कोविशिल्ड उपलब्ध

नागपूर : राज्य सरकारकडून कोविशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे मंगळवारी (दि. २४) १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण महापालिकेसह सरकारी केंद्रांवर होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.

नागरिकांना प्रथम व दुसरा डोस घेण्यासाठी लस उपलब्ध आहे. लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्रावरसुद्धा १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोविशिल्डचे लसीकरण होईल, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली.

तसेच १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व स्व. प्रभाकर दटके रोगनिदान केंद्र, एम्स, आयसोलेशन रुग्णालय, इमामबाडा, इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, मनपा स्त्री रुग्णालय, पाचपावली, प्रगती हाॅल, दिघोरी येथे उपलब्ध आहे.

Web Title: Covishield available at Municipal Centers