शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

नकली सोने विकणारी टोळी अडकली

By admin | Updated: November 29, 2015 03:25 IST

जुनाट इमारतीत राजा-महाराजांच्या दागिन्यांचे हंडे (गुप्तधन) सापडल्याची बतावणी करून नकली सोने विकणारी टोळी एका तरुणाच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या हाती लागली.

आंतरराज्यीय जाळे दोघांना अटकसाथीदार पसारनागपूर : जुनाट इमारतीत राजा-महाराजांच्या दागिन्यांचे हंडे (गुप्तधन) सापडल्याची बतावणी करून नकली सोने विकणारी टोळी एका तरुणाच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या हाती लागली. शंकर मोहन बघेल (वय १९, रा. कपिलनगर, हुडकेश्वर) आणि किसन कन्हैयालाल सोलंकी (वय ४३, रा. साईनगर, हुडकेश्वर) अशी या टोळीतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी पकडल्याचे पाहून त्यांचे साथीदार पळून गेल्याचा अंदाज आहे.शेख वसिम शेख हनिफ (वय ३०) हा अजनीतील कावरापेठमध्ये राहतो. शुक्रवारी दुपारी त्याच्याकडे दोन व्यक्ती आल्या. त्यांनी अनाथ आश्रमासाठी वर्गणी मागितली. नंतर प्यायला पाणी मागितले. चर्चा करताना ‘आम्ही अनाथ मुलांसाठी काम करतो. मिळेल त्या जागी दिवस काढतो. अशाच प्रकारे एक दिवस एका जुनाट पडक्या (खंडहर) इमारतीत जेवण तयार करीत असताना अचानक आम्हाला तेथे जमिनीत एक हंडासापडला. त्यात प्राचीन काळातील राजे-महाराजे ज्याप्रमाणे शरीरावर सोन्याचे दागिने घालायचे, तसेच सोन्याचे हार आम्हाला सापडले’, अशी आरोपींनी बतावणी केली. हे सोने विकायचे आहे. मात्र, भीतीमुळे कुणाला विकावे ते आम्हाला कळत नसल्याचे आरोपी म्हणाले. त्यांनी लाखो रुपयांचे सोने वसिमला ७० हजारात देण्याची तयारी दाखवली. सोने खरे आहे की खोटे, ते तपासण्यासाठी मागितले असता आरोपीने दागिन्याचा एक तुकडा वसिमला दिला. सराफाकडे तो तपासला असता ‘सोने खरे’ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वसिमने आरोपींकडून सोन्याचे हार खरेदी करण्याची तयारी दर्शविली. पैसे घेऊन सोने देण्याचा व्यवहार शुक्रवारी रात्री करण्याचे ठरले. त्यामुळे वसिमचा मोबाईल नंबर घेऊन आरोपी निघून गेले. (प्रतिनिधी)अनेकांना गंडाप्राथमिक चौकशीतच या दोघांनी अशा प्रकारे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशात अनेकांना गंडा घातल्याची कबुली दिली. या दोघांसोबत मोठी टोळी असावी, असा पोलिसांचा कयास आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, डीसीपी रंजन शर्मा, एसीपी नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय चंद्रशेखर ढोले, एपीआय अमोल काळे, पीएसआय बाबाराव गोस्वामी, एएसआय सुधीर बघेल, हवालदार सुरेश हिंगणेकर, शत्रुघ्न कडू, नायक विजय दासरवार, अतुल दवंडे यांनी ही कामगिरी बजावली.शंका खरी ठरलीजवळपास एक किलो सोने अवघ्या ७० हजारात कुणी कसे विकू शकतात, असा प्रश्न वसिमला पडला. त्यामुळे त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आरोपीचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्याने गुन्हेशाखेच्या पथकाशी संपर्क साधला. दरम्यान, ठरल्याप्रमाणे आरोपी बघेलचा वसिमला फोन आला. त्याने मेडिकल परिसरातील डेंटल हॉस्पिटलजवळ रात्री ७ वाजता बोलवले. वसिम तेथे गेला.बाजूला गुन्हेशाखेचे पथकही होते. बघेल आणि सोलंकीने जवळचे नकली सोन्याचे दागिने काढताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून त्यांना जेरबंद केले.