शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात कोरोनाचा पुन्हा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST

आठ कैद्यांसह नऊ पॉझिटिव्ह : मेडिकलमध्ये सर्वांची तपासणी, एकाला केले भरती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : येथील मध्यवर्ती कारागृहात ...

आठ कैद्यांसह नऊ पॉझिटिव्ह : मेडिकलमध्ये सर्वांची तपासणी, एकाला केले भरती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : येथील मध्यवर्ती कारागृहात कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केला आहे. सद्यस्थितीत एका तुरुंग रक्षकासह नऊ जण कोरोनाग्रस्त झाले आहेत.

येथील मध्यवर्ती कारागृहात आजच्या घडीला २२०० वर कैदी आहेत. जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत यातील कैद्यांपैकी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीसह २२ जणांना कोरोनाची बाधा झाली होती आणि ते सर्वच्या सर्व बरेही झाले होते. आता गुरुवारपासून पुन्हा काही कैद्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येऊ लागली आहेत. शुक्रवारी त्यातील एका कैद्याला मेडिकलमध्ये नेले असता तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला मेडिकलमध्येच दाखल करण्यात आले. शनिवारी रात्रीपासून पुन्हा आठ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे तीव्रतेने दिसून आली. या सर्वांना रविवारी दुपारी तपासणीसाठी मेडिकलमध्ये नेण्यात आले. सर्वांचे सिटी स्कॅन करून घेण्यात आले. त्यातून एका तुरुंग रक्षकासह आठ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याचे समजते. कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी एक कैदी मेडिकलमध्ये भरती करण्यात आला. तर आज कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आल्यामुळे एका तुरुंग रक्षकाला गृहविलगीकरण करण्यात आले. अन्य सात जणांना मेडिकलमध्ये ठेवायचे की त्यांच्यावर कारागृहातील इस्पितळात उपचार करायचे. याबाबत चर्चा सुरू होती.

---