शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ११ दिवसात ७२९ रुग्ण; १० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 11:23 PM

कोरोनाच्या चार महिन्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या ११ दिवसांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ७२९ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात शनिवारी ५५ रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या २,२३४ वर पोहचली, तर मृतांची संख्या ३४ झाली असून आतापर्यंत १,४६८ रुग्ण बरे झाले आहेत.

ठळक मुद्दे५५ नव्या रुग्णांची भर : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.७ टक्के

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या चार महिन्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या ११ दिवसांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ७२९ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात शनिवारी ५५ रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या २,२३४ वर पोहचली, तर मृतांची संख्या ३४ झाली असून आतापर्यंत १,४६८ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.७ टक्के आहे. या महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. पहिल्या तारखेलाच ७३ रुग्ण पॉझिटिव्ह आले, नंतर सलग तीन दिवस रुग्णसंख्या ४५ ते ५५ च्या दरम्यान होती, तर नंतरचे चार दिवस रुग्णसंख्या २७ ते ७१ रुग्णांच्या दरम्यान होती. सर्वाधिक रुग्णांची नोंद ९ जुलै रोजी झाली. १८३ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर गेल्या दोन दिवसांत १२४ रुग्णांची भर पडली, असे ७२९ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, मृत्यूचे प्रमाणही वाढले. पाच दिवसांत १० मृत्यूची नोंद झाली. एकूण ३४ मृतांमध्ये २२ मृत्यू नागपूर जिल्ह्यातील आहेत तर १२ मृत्यू नागपूरबाहेरील आहेत. शिवाय, अमरावती व अकोला येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू नागपुरात झाला आहे. आज मेयो, मेडिकल व एम्समधून ३८ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १,४६८ झाली आहे. यातील ७३३ रुग्ण मेयो, मेडिकल, एम्स व आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. संस्थात्मक अलगीकरण कक्षात १,७९६ संशयित दाखल आहेत.७३३ रुग्ण उपचाराखालीआज मेयोच्या प्रयोगशाळेत १३, मेडिकलच्या प्रयोगशाळेत दोन, नीरीच्या प्रयोगशाळेत २१, खासगी प्रयोगशाळेतून १०, तर रॅपिड अ‍ॅण्टिजन चाचणीतून नऊ रुग्ण असे ५५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेयोमध्ये सध्या ८० रुग्ण उपचार घेत असून ६६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मेडिकलमध्ये १४१ रुग्ण उपचाराखाली असून ६२९ रुग्ण बरे झाले आहेत. १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एम्समध्ये ५५ रुग्णांवर उपचार सुरू असून १४२ रुग्ण बरे झाले आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये २४ रुग्ण उपचार घेत आहेत. कामठी रुग्णालयात ३१, आमदार निवासातील सीसीसीमध्ये १२३, मध्यवर्ती कारागृहातील सीसीसीमध्ये २१५ तर ६४ रुग्ण भरती प्रक्रियेत असून एकूण ७३३ रुग्ण उपचाराखाली आहेत. एकूण २,२३४ रुग्णसंख्येत ३२१ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.संशयित : २,४७८बाधित रुग्ण : २,२३४घरी सोडलेले : १,४६८मृत्यू : ३४

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर