शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या लढ्यासाठी समन्वय समिती

By admin | Updated: January 15, 2016 03:40 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा सर्वपक्षीय विदर्भवादी नेत्यांनी एकत्र येऊन लढण्याचा संकल्प केला आहे.

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा सर्वपक्षीय विदर्भवादी नेत्यांनी एकत्र येऊन लढण्याचा संकल्प केला आहे. विदर्भाच्या लढ्याची रूपरेषा ठरविण्यात येणार असून त्यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. गुरुवारी रामदासपेठ येथील एका हॉटेलात दुपारी ही बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ विदर्भवादी नेते माजी खा. दत्ता मेघे, माजी मंत्री रणजित देशमुख, महाराष्ट्राचे महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे, माजी मंत्री मधुकरराव किंमतकर, आ. आशिष देशमुख, आमदार समीर मेघे, आमदार पंकज भोयर, आ. चरण वाघमारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, अ‍ॅड. अनिल किलोर, चंद्रकांत वानखेडे, प्रा. शरद पाटील, मोहन गायकवाड, अ‍ॅड. मुकेश समर्थ, देवेंद्र पारेख, प्रकाश इटनकर,हरीश इथापे, अरुण बोंदे, प्रमोद पांडे, नितीन रोंघे, अ‍ॅड. नीरज खांदेवाले, अ‍ॅड. संदेश सिंगलकर, अमिताभ पावडे, अ‍ॅड. दीपक पाटील, धनंजय मिश्रा, जुुगल कोठारी आदींसह विदर्भातून जवळपास ७० ते ७५ लोक उपस्थित होते. ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. या बैठकीत स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जवळपास सर्वांनीच आपापली मते व्यक्त केली. अनेकांनी सूचनाही केल्या. स्वतंत्र विदर्भासाठी लढा पुकारण्यावर सर्वांचेच एकमत होते. आंदोलनाची पुढची दिशा ठरविणे आणि त्यासाठी सर्वपक्षीय समन्वय समिती स्थापन करणे यावर सर्वांचेच एकमत झाले. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर समन्वय समिती स्थापन करण्याची घोषणा बैठकीत करण्यात आली. परंतु यासंदर्भात आता काही उघड करावयाचे नाही, असेही ठरविण्यात आले. लवकरच समितीची घोषणा करून आंदोलनाची दिशाही ठरविण्यात येईल. (प्रतिनिधी)