शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
3
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
4
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
5
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
6
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
7
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
8
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
9
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
10
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
11
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
12
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
13
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
14
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
15
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
16
Nashik: घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
17
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
18
Raid: सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
19
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
20
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँकांच्या कर्जाची मदार शिखर बँकेवर

By admin | Updated: May 25, 2014 00:50 IST

राज्यातील शेतकरी पीक कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर अवलंबून असला तरी या बँकाही राज्य सहकारी (शिखर) बँकेवर अवलंबून आहेत. मात्र राज्य बँकेवर संचालक

यवतमाळ : राज्यातील शेतकरी पीक कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर अवलंबून असला तरी या बँकाही राज्य सहकारी (शिखर) बँकेवर अवलंबून आहेत. मात्र राज्य बँकेवर संचालक मंडळाऐवजी प्रशासक असल्याने जिल्हा बँकांना मागणीच्या अर्धेच कर्ज मंजूर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

राज्य सहकारी बँकेवरील संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. त्याऐवजी सचिवस्तरीय प्रशासक मंडळ नेमण्यात आले. सुमारे दीड वर्षांंपासून प्रशासकांच्या नेतृत्वात बँकेचा कारभार सुरू आहे. संचालक मंडळ आणि प्रशासक यांच्या कारभारात तफावत आढळत असल्याचा सहकार क्षेत्रातील सूर आहे.

राज्यातील शेतकरी आणि जिल्हा बँकांचे हित डोळ्यापुढे ठेऊन कर्ज मंजूर करताना संचालक मंडळ व्यापक दृष्टीकोन ठेवते. तर प्रशासक केवळ नियमावर बोट ठेऊन काम करीत असल्याचा सूर आहे.

शेतकरी कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे येतात. मात्र जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती तेवढी भक्कम राहत नसल्याने या बँकासुद्धा राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घेतात. परंतु राज्य सहकारी बँक मागणीच्या केवळ अर्धेच कर्ज मंजूर करते.

राज्य बँकेने व्यापक दृष्टिकोन ठेऊन या कर्जात किमान १0 टक्के तरी वाढ करावी, अशी जिल्हा बँकांची अपेक्षा असते. मात्र प्रशासक तो दृष्टिकोन बाळगत नाही. राज्य बँकेवर संचालक मंडळ असते तर राज्यातील सर्वच जिल्हा बँकांना किमान १0 टक्के वाढीव कर्ज मंजूर झाले असते, असे सहकार क्षेत्रातून सांगण्यात आले.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा विचार केल्यास या बँकेने शिखर बँकेला ४00 कोटींच्या कर्जाची मागणी केली होती. मात्र त्यातून केवळ २३0 कोटी रुपये मंजूर झाले आहे. हीच अवस्था राज्यातील अन्य जिल्हा बँकांची आहे.

एकीकडे जिल्हा प्रशासक सहकारी बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट किती तरी अधिक पटीने वाढवून देते.

सततचा दुष्काळ व नापिकीमुळे कर्जाची वसुली मात्र होत नाही. त्यामुळे मागणी व पुरवठय़ातील तफावत वाढत जाऊन अनुशेष निर्माण होतो. (जिल्हा प्रतिनिधी)