शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संपर्क वाढला, मात्र संवाद घटला

By admin | Updated: September 11, 2014 01:07 IST

तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे, मात्र आप्तस्वकीय दुरावले आहे. संपर्क वाढला आहे, मात्र संवाद घटला आहे. घरात सोबत असतानाही मुलांच्या भावनिक गरजा दुर्लक्षित झाल्या आहेत.

तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या गंभीर : दीप्ती ख्रिश्चन नागपूर : तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे, मात्र आप्तस्वकीय दुरावले आहे. संपर्क वाढला आहे, मात्र संवाद घटला आहे. घरात सोबत असतानाही मुलांच्या भावनिक गरजा दुर्लक्षित झाल्या आहेत. नकळत मुले अनोळख्यांशी जवळीक साधत आहे. कुटुंबाचा सहवास हरविल्याने मुले एकटी पडली आहेत. त्यामुळे समाजात आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. हे सर्व टाळायचे असेल तर मुलांना, विद्यार्थ्यांना समजून घेऊन, त्यांच्या भावनिक गरजा पूर्ण करणे महत्त्वाचे आहे, असे मत हिस्लॉप महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दीप्ती ख्रिश्चन यांनी व्यक्त केले. जागतिक आत्महत्या परावृत्त दिनाच्या निमित्ताने श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागातर्फे ‘शैक्षणिक सुधारणा आणि विद्यार्थ्यांमधील आत्महत्येची मानसिकता’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राच्या उद्घाटनाला मुख्य अतिथी म्हणून दीप्ती ख्रिश्चन उपस्थित होत्या. तसेच नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोक गांधी, महाविद्यालयाच्या प्राचार्य स्नेहल पाळधीकर, मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. दीपा बलखंडे उपस्थित होते. चर्चासत्रात प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शैलेश पानगावकर यांनी ‘आत्महत्या मानसिकतेची आंतरिक कारणे’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत मानसशास्त्र विषयातील तज्ज्ञांनी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या विविध सामाजिक विषयांवर पेपर प्रेझेंटेशन सादर केले. चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी ‘आत्महत्येला रोखण्यासाठी समन्वयकाची भूमिका’ या विषयावर स्वाती धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ‘मानसिक आरोग्य व जगण्याचे कौशल्य’ या विषयावर डॉ. नीलम देशमुख मार्गदर्शन करणार आहे. या चर्चासत्राला शिक्षण मंडळाचे सहकार्यवाह अ‍ॅड. राजेंद्र राठी, मंडळाचे पदाधिकारी डॉ. सी. जी. पांडे, प्रा. साधना मूल, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमृता गोखले तर आभारप्रदर्शन प्रा. आरती बरगे यांनी केले. (प्रतिनिधी)