गृहमंत्र्यांकडून शहीद कुटुंबीयांचे सांत्वन

By Admin | Updated: May 14, 2014 00:11 IST2014-05-14T00:11:02+5:302014-05-14T00:11:02+5:30

चामोर्शी तालुक्याच्या पावीमुरांडा, मुरमुरी भागात रविवारी झालेल्या नक्षली हल्ल्यात शहीद दोन जवानांच्या कुटुंबीयांची राज्याचे गृहमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री ...

The consolation of the martyrs family from the Home Minister | गृहमंत्र्यांकडून शहीद कुटुंबीयांचे सांत्वन

गृहमंत्र्यांकडून शहीद कुटुंबीयांचे सांत्वन

चामोर्शी/देसाईगंज : चामोर्शी तालुक्याच्या पावीमुरांडा, मुरमुरी भागात रविवारी झालेल्या नक्षली हल्ल्यात शहीद दोन जवानांच्या कुटुंबीयांची राज्याचे गृहमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी भेट घेतली. परिवारातील सदस्यांचे सांत्वन करीत शासन व पोलीस दल आपल्या पाठीशी आहे, असा विश्‍वास त्यांना दिला.

चामोर्शी येथील शहीद जवान रोशन डंबारे यांच्या घरी पालकमंत्री आर. आर. पाटील गेलेत. रोशनची पत्नी शोभना, वडील माजी नायब तहसीलदार हनुमंत डंबारे, आई अरूणा डंबारे, भाऊ उज्वल, बहिण पिंकी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यo्री आत्राम, राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल, पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी देवेंद्रसिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक, सहाय्यक पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. खंडेराव धारणे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश ठाकूर, चामोर्शीचे तहसीलदार खंडारे आदी उपस्थित होते. त्यानंतर पालकमंत्र्यांनी देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील शहीद जवान दुर्योधन नाकतोडे यांच्या परिवाराची भेट घेतली.

यावेळी दुर्योधनचे आई-वडील व नातलग उपस्थित होते. दुर्योधनच्या घरूनच यावेळी पाटील यांनी रूग्णालयात भरती असलेल्या दुर्योधनच्या पत्नीशीही भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. तुम्ही काळजी करू नका, शासन आपल्या पाठीशी आहे, असा विश्‍वास त्यांनी दिला. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, देसाईगंजचे तहसीलदार अजय चरडे व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The consolation of the martyrs family from the Home Minister