दिलजीत दोसांझ भारतीय नाही? ४ वर्षांआधीच स्वीकारलं अमेरिकेचं नागरिकत्व; का होतेय चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:42 IST2026-05-14T13:41:10+5:302026-05-14T13:42:06+5:30

दिलजीतचं लग्नही झालंय? कोण आहे त्याची पत्नी; एक मुलगाही असल्याच्या चर्चा

diljit dosanjh is usa citizens rumours says he has a wife and a son both lives in USA | दिलजीत दोसांझ भारतीय नाही? ४ वर्षांआधीच स्वीकारलं अमेरिकेचं नागरिकत्व; का होतेय चर्चा?

दिलजीत दोसांझ भारतीय नाही? ४ वर्षांआधीच स्वीकारलं अमेरिकेचं नागरिकत्व; का होतेय चर्चा?

प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ भारतीय नागरिक नाही अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. दिलजीत अमेरिकेचा नागरिक आहे. सप्टेंबर २०२२ सालीच त्याने अमेरिकेचं नागरिकत्व घेतल्याची चर्चा होत आहे.तेव्हापासूनच तो या पासपोर्टवर जगभरात प्रवास करत आहे. तसंच दिलजीतची पत्नी असून त्याला एक मुलगा असल्याचाही खुलासा एका रिपोर्टमध्ये केला गेला आहे. काय आहे प्रकरण?

'द इंडियन एक्स्प्रेस रिपोर्ट' अनुसार, दिलजीत २०२२ पासूनच भारतात येण्यासाठी ई-व्हिसाचा वापर करत आहे. त्याच्याकडे ओवरससीज सिटीझन ऑफ इंडिया हे कार्डही नाहीये. त्याचा शेवटचा भारतीय पासपोर्ट २०१८ साली मुंबईतून जारी झाला होता. याआधीचा पासपोर्ट झाम्बियामध्ये इश्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये असंही म्हटलं आहे की दिलजीतची पत्नी संदीप कौर आहे जी अमेरिकेचीच नागरिक आहे. त्याने अमेरिकेचं नागरिकत्व घेताना कॅलिफोर्नियाच्या ५ बेडरुम असलेल्या बंगल्याचा पत्ता दिला होता. मात्र दिलजीतने कधीही या चर्चांवर उत्तर दिलं नाही. दिलजीत खऱ्या आयुष्या खूप प्रायव्हेट व्यक्ती आहे. तो कधीच वैयक्तिक आयुष्यावर बोलत नाही. त्याचे आई वडील लुधियाना येथे राहतात एवढंच त्याने एकदा रिव्हील केलं होतं. त्यामुळे त्याच्या पत्नी आणि मुलाबद्दलच्या चर्चांवर त्याने अधिकृत भाष्य केलेलं नाही. दिलजीतला मधल्या काळात बऱ्याच धमक्याही आल्या होत्या. सुरक्षेच्या कारणावरुनच त्याने आपल्या कुटुंबियांना प्रसिद्धीझोतापासून दूर ठेवल्याची चर्चा आहे.

याआधी २०२४ साली पंजाबी अभिनेता एमी विर्कने दिलजीतचं लग्न झाल्याची हिंट दिली होती.  दिलजीतच्या या चर्चा तेव्हा सुरु झाल्या जेव्हा त्याच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना जोर आला. एका सिव्हील सोसायटी ग्रुपने त्याला पंजाबचं नेतृत्व करण्याची विनंती केली होती. मात्र दिलजीतने स्पष्ट नकार दिला. माझं काम लोकांचं मनोरंजन करणं आहे अशी त्याने प्रतिक्रिया दिली होती. तसंच दिलजीत अमेरिकेचा नागरिक असेल तर तो पंजाबची निवडणूक लढवू शकणार नाही हे स्पष्ट होतं.

Web Title : दिलजीत दोसांझ: क्या अमरीकी नागरिक हैं? नागरिकता पर राजनीतिक बहस छिड़ी।

Web Summary : रिपोर्ट्स के अनुसार, दिलजीत दोसांझ 2022 से अमेरिकी नागरिकता रखते हैं, भारत के लिए ई-वीजा का उपयोग कर रहे हैं। कथित तौर पर उनकी पत्नी और बच्चा है, गोपनीयता बनाए हुए हैं। राजनीतिक भागीदारी पर सवाल उठे।

Web Title : Diljit Dosanjh: American Citizen? Citizenship Sparks Political Debate.

Web Summary : Reports suggest Diljit Dosanjh holds US citizenship since 2022, using e-visas for India. He reportedly has a wife and child, maintaining privacy. Political involvement is questioned.